फिट असनूही का आला सिद्धार्थ शुक्लाला हृदयविकाराचा झटका?

02 Sep 2021 18:43:02
SID_1  H x W: 0 
  
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने, तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणातहृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाला का आला हृदयविकाराचा झटका का आला? या मागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीयांमध्ये हृदयविकाराचा झटका जगाच्या तुलनेत ८-१० वर्षांपूर्वी येतो.
 
 
आपल्या हृदयाचा रक्त पुरवठा तीन बाजूंनी होतो. शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयाच्या शिरामध्ये अडथळे येऊ लागतात. ४०%पर्यंत अडथळा जास्त समस्या निर्माण करत नाही. जेव्हा हा अडथळा ७०%पेक्षा जास्त वाढतो, तेव्हा हृदयातील रक्त प्रवाह मंद होतो आणि रक्ताचे पंपिंग थांबते. याला हृदयविकाराचा झटका म्हणतात.
 
 
हृदयविकाराची समस्या प्रामुख्याने वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे होते. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अति खाणे, धूम्रपान हे घटक कोलेस्टेरॉलसाठी जबाबदार आहेत. बर्याच बाबतीत ते अनुवांशिक देखील आहे. याशिवाय, फुफ्फुसात गोठल्यामुळे, मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे, औषधांच्या अतिसेवनामुळे, व्हायरल इन्फेक्शनमुळे किंवा हृदयातील कोणत्याही आजारामुळे देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
 
 
Powered By Sangraha 9.0