गणेशोस्तवानिमित्त मुंबई पोलिसांचे आहेत 'हे' नियम

02 Sep 2021 13:17:17

Ganeshostav_1  
 
मुंबई : एकीकडे महाराष्ट्र राज्य सरकारवर सणांवरील निर्बंधांवरून विरोधी पक्षांनी धारेवर धरले आहेत. तर, दुसरीकडे गणेशोस्तवानिमित्त मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस स्थानकांना सतारिक राहण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोस्तवाला अवघा एका आठवडा शिल्लक असताना काही नियम जाहीर केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
येत्या गुरुवारपासून मास्क न घालून रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करणार आहेत. सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी सूचना देताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मास्क न घालून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी. भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे. तसेच भक्तांना मंडपात येऊन दर्शन घ्यायचे असेल तर अशा भक्तांसाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करावी.
 
 
गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण १३ विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांमध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १ एपीआय, २ पीएसआय असे ११ कॉन्स्टेबल असणार आहेत. मुंबईत एकूण १३ झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. हे पथक झोनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवेल. बुधवारी विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवासंदर्भातल्या सूचना दिल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0