'बिग बॉस'फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2021
Total Views |

Siddahrth Shukla_1 &
 
 
मुंबई : 'बिग बॉस'फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे अकाली निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्च्याया आधी काही औषधे घेतली होती. यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. छोट्या पडद्यावर सुपरस्टार असलेल्या आणि बिग बॉस १३ सीजनचा विजेता असलेल्या सिद्धार्थच वयाच्या ४०व्या वर्षी निधन झाल्याने हिंदी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केले.
 
 
 
सिद्धार्थने २००४ मध्ये एकदा आईच्या सांगण्यावरून मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. इथून पुढे त्याने अनेक जाहिरातीही केल्या. २००८ च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०१४ मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी ७ या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. सध्या करण जोहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये तो शेवटचा दिसला होता.
 
 
@@AUTHORINFO_V1@@