मोदी हे मोदी आहेत, दुसरे मोदी होऊ शकत नाही; पंतप्रधानांच्या वाढदिवशी राऊतांची स्तुतीसुमने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2021
Total Views |
narendra modi_1 &nbs


मुंबई -
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी मोदींचे कौतुकही केले आहे, शिवाय त्यांना टोमणा देखील मारला आहे.

पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना राऊतांनी मोदींचं भरभरून कौतुक केलं. मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभल आहे. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर मोदींनी भाजपला शिखरावर नेलं आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजप एकहाती सत्ता घेऊन आली. त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं. ही त्यांच्या नेतृत्वाची कमाल आहे. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही.
 
 
मोदींचं कार्य, भूमिका आणि नेतृत्वाबद्दल कितीही विरोध असला तरी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. मोदी हे मोदी आहेत, असे राऊत म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, "दुसरे मोदी होऊ शकत नाही. संध्याकाळी वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे पाहावं लागेल. देशातील जनतेच्या महागाईच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच असतील. पेट्रोल डिझेल कमी करणारा केक मोदी कापतील असं वाटतं," असा चिमटाही त्यांनी काढला.
@@AUTHORINFO_V1@@