अफगाणिस्तानच्या महिला मंत्रालयात महिलांनाच प्रवेश करण्यास बंदी; तालिबानी आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2021
Total Views |
Taliban _1  H x



काबूल - अफगाणिस्तानामध्ये सरकार स्थापनेनंतर तालिबानची आणखी एक हुकूमशाही वृत्ती समोर आली आहे. अफगाणिस्तानात नवीन सरकार स्थापन केल्यानंतर तालिबानने आता महिला मंत्रालयामध्ये महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, महिला व्यवहार मंत्रालय असलेल्या इमारतीत फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जातोय.
 
 
 
एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्याने सांगितले की, चार महिलांना इमारतीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे महिलांनी आता तालिबान सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्रालयाजवळ निदर्शने करण्याची योजना आखल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात काबूल ताब्यात घेतल्यानंतर प्रथमच माध्यमांशी बोलताना तालिबानने आश्वासन दिले की, हा गट महिलांना इस्लामवर आधारित त्यांचे अधिकार देईल. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, तालिबान महिलांना इस्लामवर आधारित त्यांचे हक्क देण्यासाठी कटिबद्ध आहेत. ते म्हणाले की महिलांना आरोग्य क्षेत्र आणि इतर क्षेत्रांमध्ये जेथे त्यांना गरज आहे तेथे काम करता येईल. महिलांबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
 
 
 
 
परंतु अलीकडेच, स्थानिक माध्यम असलेल्या टोलो न्यूजने तालिबानच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही महिलेला मंत्री केले जाणार नाही. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये तालिबानची भीती दिवसागणिक वाढत आहे. तालिबानचे इस्लामिक मूलतत्त्ववादी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत आहेत आणि निरपराध लोकांना मारत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानने अलीकडेच एका २१ वर्षीय तरुणीची हत्या केली. कारण तिने घट्ट कपडे घातले होते आणि तिच्यासोबत कोणतेही पुरुष नातेवाईक नव्हता. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी आल्यापासून तालिबानी अतिरेकी निरपराध लोकांना जबरदस्तीने त्यांच्या घरातून बेदखल करून ठार मारत असल्याची माहिती आहे. त्यांनी ताब्यात घेतलेल्या भागात, शरियत कायद्याने महिलांना एकटे घर सोडण्यास बंदी घातली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@