‘कट्टरतावाद’ हे जगापुढील सर्वांत मोठे आव्हान; शांघाय सहकार्य परिषदेत पंतप्रधानांचे प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2021
Total Views |
modi_1  H x W:

अफगाणिस्तानच्या घडामोडींनी जगापुढील धोका वाढला
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सध्याच्या काळात जगापुढे अनेक आव्हाने आहेत, मात्र सर्वांत मोठे आव्हान हे कट्टरतावादाचे आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडींवरून हे आव्हान अधिकच स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य परिषदेमध्ये शुक्रवारी केले.
शांघाय सहकार्य परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यावेळी त्यांनी इस्लामी कट्टरतावादाचा संपूर्ण जगाला असलेला धोका अधोरेखित केला.
 
 
इतिहासाकडे पाहिल्यास मध्य आशिया क्षेत्र हे समन्वयवादी आणि प्रागतित मूल्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. सुफीवादासारख्या परंपरेचा येथे उगम होऊन ती संपूर्ण जगभरात पसरली. या क्षेत्राच्या सांस्कृतिक वारशामध्ये अजुनही त्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. शांघाय सहकार्य परिषदेस २० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्याचा विचार करण्याची हि योग्य वेळ आहे. या क्षेत्रामधील सर्वांत मोठे आव्हान हे शांतात, सुरक्षा आणि परस्पर विश्वासाच्या संदर्भात आहेत. या सर्व समस्यांचे मूळ हे कट्टरतावादात असून अफगाणिस्तानातील सध्याच्या घडामोडींनी हे आव्हान अधिकच स्पष्ट केले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
भारत आणि शांघाय सहकार्य परिषदेतील सर्व देशांमध्ये इस्लामशी संबंधित संयमित, सहिष्णु आणि सर्वसमावेश संस्था – परंपरा अस्तित्वास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, परिषदेतील सदस्य देशांदरम्यान एक मजबूत समन्वय साधण्यासाठी काम करण्याची गरज आहे. मध्य आशियामध्ये दळणवळण वाढविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. जमिनीने वेढलेल्या मध्य आशियायी देशांना भारतासारख्या विशाल बाजारपेठेस जोडून घेतल्याने मोठे लाभ होऊ शकतात. मात्र, दळवणवळण हे कधीही एकांगी होऊ शकत नाही. त्यासाठी परस्परविश्वास दृढ करण्यासाठी दळणवळण प्रकल्पांमध्ये सहकार्यासोबतच सर्व देशांच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर होणे गरजेचे असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@