येवला तालुक्यात मुस्लीम कुटुंबात पाच वर्षांपासून श्रीगणेशाची स्थापना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2021
Total Views |

गणपती_1  H x W:
 
 
 
येवला : तालुक्यातील पुरणगाव येथील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात श्रीगणेशाची स्थापना केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे कुटुंब नियमितपणे दरवर्षी गणेशाची स्थापना करत आहे. त्यांचा हा भक्तिभाव सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या या भक्तीला समाजानेही विरोध केला नाही व घरातल्या वडिलधार्‍यांकडूनही कोणी आक्षेप घेतला नाही. गणेशाची स्थापना करणारे रहेमान हे धर्माने मुस्लीम समाजाचे असले, तरी त्यांचा मित्रपरिवार मात्र सर्वधर्मीय आहे. रहेमान यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळे ते परिसरात परिचित आहे.
 
...म्हणून गणेशाची स्थापना
 
गावातील उजव्या सोंडेच्या नवसाला पावणार्‍या सिद्धिविनायकाला एक नवस केला होता. त्यांच्या नवसाला श्रीगणेश पावले. त्यानंतर त्यांची गणपती बाप्पावरील श्रद्धा आणखी वाढत गेली. आता ते दरवर्षी घरात श्रीगणेशाची स्थापना करीत आहे. रहेमान या भक्तीबाबत सांगतात की, मी सर्वधर्म समभाव मानतो, देव कुठलाही असो तो सर्वत्र सारखाच आहे अशी माझी भावना आहे.
@@AUTHORINFO_V1@@