त्या अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्याने बिल्डरने घेतली एबीसीकडे धाव

16 Sep 2021 23:33:26


 
kdmc bandkam photo_1 
 
 
 
 
कल्याण : दावडी येथील अवैध इमारत तोडू नये यासाठी अधिका:यांनी पैसे घेतले असल्याचा आरोप बिल्डरने नुकताच केला होता. पण या प्रकरणात पुढे अधिका:यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे बिल्डरने लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडे धाव घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दावडी परिसरात डीपी रस्त्याच्या आड येणारी सहा मजली अवैध इमारत काही दिवसांपूर्वी पाडण्याची कारवाई महापालिकेने केली होती. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी अधिकारी अनंत कदम आणि दीपक शिंदे यांनी बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप केला होता. बिल्डर मुन्ना सिंग यांनी या प्रकरणातील एका हॉटेलमध्ये अधिका:यासोबत चर्चा करतानाच सीसीटीव्ही फूटेज सादर केले आहे.या अधिका:यांनी प्रत्येकी एक लाख रूपये आणि आयुक्तांच्या नावे 25 लाख रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप सिंग यांनी केला होता.
या प्रकरणात महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. दोन्ही अधिका:यांची चौकशी केली. तसेच बिल्डरची सुनावणी ही घेतली. पण या प्रकरणात महापालिका प्रशासन अधिका:यांच्या बाबतीत ठोस कारवाई करीत नसल्याचे आरोप सिंग यांनी केला आहे. महापालिका प्रशासन ठोस कारवाई करीत नसल्याने बिल्डर सिंग यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणाबाबत आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकरणाची १७ सप्टेंबर रोजी समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. आता चौकशी सुरू आहे. बिल्डर सिंग यांची पहिली सुनावणी झाली आहे. दुस:या सुनावणीसाठी त्यांना कळविले आहे. बिल्डर सिंग यांनी या प्रकरणात अधिका:यांवर आरोप केलेले आहेत त्याप्रमाणो ठोस पुरावे सादर करावेत. या प्रकरणात तथ्य आढळून आल्यास व अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
बिल्डर कारवाई टाळण्यासाठी अशा प्रकराचे आरोप करीत असतात. पण महापालिकेने गेल्या दी़ड वर्षात ६२० अवैध बांधकाम जमीन दोस्त करण्याचे काम केले आहे. या पुढील काळात ही अवैध बांधकामावर कारवाई सुरूच राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
  
 
Powered By Sangraha 9.0