वाहन परवाना काढण्यासाठीची परीक्षा आता सुट्टीच्या दिवशीसुद्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2021
Total Views |
driving-dl-ll-1_1 &n 
नाशिक : वाहन चालवण्याचा पक्का परवाना काढण्यासाठीची परीक्षा आता सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारीदेखील देता येणार आहे. कोरोना काळात पक्के परवाना काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी परिवहन विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व परिवहन विभागांना विभागाच्या सारथी या संकेतस्थळावर या परीक्षा घेण्याचा सूचना नुकत्याच दिल्या आहेत. अर्जदारांना घरबसल्या मोबाइलद्वारे शिकाऊ वाहन परवाना काढता येणार असून याच धर्तीवर परिवहन राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना रविवारी पक्क्या लायसन्ससाठीची परीक्षा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना निर्बंधांमुळे शिकाऊ लायसन्सला देण्यात आलेली मुदतवाढ तसेच ‘फेसलेस प्रणाली’मुळे लायसन्सची चाचणी देणार्‍यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी वेळ मिळण्यास अडचण येत होती.
 
शिकाऊ अनुज्ञप्तीधारकांनी शिकाऊ अनुज्ञप्तीची मर्यादा संपुष्टात येण्याअगोदर त्यांची पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी होणे, अनिवार्य असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सप्टेंबर 2021 अखेरपर्यंत पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीकरिता सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार व रविवार या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
या संकेतस्थळावर करा अर्ज

विभागाच्या www.sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ‘स्लॉट बुकिंग’ करता येणार आहे. त्यात ऑप्शन विभागात पक्के लायसन्स काढण्यासाठी अर्जदारांना सोयीनुसार ‘अपॉईंटमेंट’ घेता येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@