केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे राज्यातील सहकार चळवळीला पाठबळ देण्याची आवश्यकता : प्रविण दरेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2021
Total Views |

pravin darekar_1 &nb


सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न


मुंबई,दि.१६ सप्टेंबर: 
महाराष्ट्रातील खासगी बँका चांगल्या पद्धतीने चालत असून सहकारी बँका मात्र अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे कधीकाळी खासगी कारखान्याचं रूपांतर सहकारी साखर कारखान्यात होत असताना, आज सहकारी कारखान्याचे रूपांतर खासगी कारखान्यात का होत आहे? आणि तेच सहकारी साखर कारखाने खासगी झाल्यावर कसे चांगले चालतात याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच सहकार क्षेत्राला नव्याने उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी एकत्रितपणे सहकार क्षेत्राला अधिक पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज सांगितले.


सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनात पार पडला. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभातपती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,गृह राज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्य मंत्री विश्वजित कदम, गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समितीचे कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले की, आयोजकांनी या कार्यक्रमाला दिलेले “प्रेरणोत्सव” हे नाव अतिशय समर्पक आहे. ज्या वेळी व्यक्तीचा जन्मोत्सव सोहळा होतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेरणा घेऊन, ते जगले कसे, त्यांनी आपलं कर्तृत्व कशाप्रकारे निर्माण केलं त्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला कसे पुढे जाता येईल हा सकरात्मक विचार या कार्यक्रमा मागे आहे तो अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


महाराष्ट्रात सहकार क्षेत्राला आदर्श दिशा देण्याचे काम गुलाबराव पाटिल यांनी केलं. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये ज्यांनी वेगळं योगदान दिलं त्या गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी सोहळा असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे आनंद होत आहे. गुलाबराव पाटील यांचे योगदान मी स्वतः पहिले नसले तरी सहकार क्षेत्रात त्यांनी अत्यंत भरीव कामगिरी केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पत पुरवठयाचे धोरण असो किंवा ज्या वेळी शेतकऱ्याला उस लागवडीसाठी पत पुरवठाची आवश्यकता होती, सीडलेस द्राक्षासाठी पत पुरवठाची आवश्यकता होती, तेव्हा ते धाडस गुलाबराव पाटील यांनी केलं. साधारण १९८२-८३ च्या वेळेस राज्यातील साखर कारखाने अडचणीत होते, त्यावेळी त्यांच्या पुनर्जीवन करण्यासाठी समिति नेमली होती, त्या समितीचे अध्यक्ष सुद्धा गुलाबराव पाटील होते. आजही त्यांचा अहवाल सहकार क्षेत्राला, कारखानदार क्षेत्रासाठी नक्कीच दिशादर्शक आहे. त्यामुळे सांगली असो वा कोल्हापूर या विभागात सहकार क्षेत्राचं जाळं निर्माण करण्याचं काम गुलाबराव पाटील यांनी केल्याचे दरेकर यांनी सांगितले.


आज सहकार चळवळ अडचणीत आहे. त्या सहकार चळवळीला उर्जिता अवस्था देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी जरी विधानपरिषद विरोधी पक्ष नेता, आमदार असलो तरी माझ्या कामाची सुरवात एक सहकारी कार्यकर्ता म्हणून झाली. सहकारी संस्थेच्या माध्यमातून झाली. सहकाराच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे समाजाला काही देऊ शकतो हे मला माहीत आहे, सहकाराची ताकद मला माहीत आहे. त्यामुळे सहकारी चळवळीच्या दृष्टीने मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की, सहकार संदर्भात काही व्यापक योजना तयार करण्याची आवश्यकता आहे. आज खासगी बँक चांगल्या पद्धतीने चालत असताना सहकरी बँका डबघाईला येत असल्याचे चित्र आहे. या सर्व सहकार चळवळीचा अभ्यास करून विविध कार्यकारी सोसायट्यापासून, राज्य सहकारी बँकापर्यंत किंवा राज्याच्या संघापर्यंत व्यापक विचार करण्याची आवश्यकता आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तसा विचार जरी झाला तरी या जन्मशताब्दी सोहळ्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.


दरेकर म्हणाले, सभापतींचे आपण मनापासून आभार मानत आहे. मागील खेपेस राजारामबापू यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केलं. त्यानंतर २-३ अन्य उत्तम कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. आज गुलाबराव पाटील यांचा प्रेरणोत्सव कार्यक्रम विधानभवनात होत आहे. आमच्यासारख्या नव्या पिढीला, सहकार क्षेत्रात, राजकारणात, समाजकारणात काम करणाऱ्या लोकांना सहकार क्षेत्रात काय करण्याची आवश्यकता आहे, आतापर्यंत सहकार क्षेत्रासाठी कोणत्या व्यक्तींचे योगदान आहे. बदलत्या परिस्थितीत सहकार क्षेत्राला कशा प्रकारे पुढे घेऊन जायचं यासाठी आजचा कार्यक्रम दिशादर्शक ठरेल. सहकार चळवळीला सशक्त करत पुन्हा एकदा ग्रामीण व्यवस्थेच्या विकासामध्ये सर्व जण नक्कीच एकत्र येऊन सकारात्मक काम करतील अशाप्रकरचा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@