ओबीसी आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाचे आंदोलन

16 Sep 2021 23:51:35
 

morcha aandolan photo_1&n 

 
 
कल्याण : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत गेल्या सहा महिन्यापासून महाविकास आघाडी सरकार टोलवाटोलवी करीत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा अशी मागणी वारंवार करून ही आघाडी सरकारने कोणातीही पावलं उचलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणा:या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे कल्याण तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला महाविकास आघाडी सरकारने निधी ही अद्याप र्पयत दिलेला नाही. या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. ओबीसी आरक्षण समवेत विविध विषयावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी 15 सप्टेंबरला कल्याण तहसीलदार कार्यालयसमोर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार , माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार रविंद्र चव्हाण, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, कल्याण डोंबिवलीतील सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, सर्व मोर्चे, आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0