सक्षम नेतृत्व : पंतप्रधान नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2021
Total Views |

Narendra modi_1 &nbs
 
 
 
भारताला राष्ट्रीय आणि वैश्विक पातळीवर नव्या उंचीवर नेणारे, सर्वसामान्य भारतीयांच्या आशाआकाशांची पूर्तता करणारे देशाचे सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने मोदींच्या नेतृत्वाचे विविधांगी पैलू उलगडणारा हा लेख....
 
 
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना इतिहासाकडेही वळून पाहणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, जो इतिहासातून धडा घेत नाही तो काहीच शिकत नाही. जर आपण देशाच्या इतिहासातील कालावधीचे विशेषतः स्वतंत्र भारताच्या गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासाचे थोडक्यात विश्लेषण केले, तर त्याचे तीन प्रमुख टप्पे सांगता येतील. त्याचा पहिला टप्पा १९४७ ते १९७७चा कालावधी आहे.
 
 
१९४७ ते १९७७ हा कालावधी स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या राष्ट्रवादाच्या भावनेला एका कुटुंबाच्या सत्तेसाठी एका कुटुंबाला समर्पित करण्याचा कालावधी म्हणता येईल. दादाभाई नौरोजी, पंडित मदनमोहन मालवीय, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक या महापुरुषांनी स्वातंत्र्य संग्रामातून अद्भुत जागरूकता निर्माण केली. पण, गंमत अशी होती की, या महापुरुषांनी फक्त कष्ट केले. त्यांना त्यांच्या मेहनतीचा आनंद घेण्याची इच्छा नव्हती. त्यांचा उद्देश फक्त देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करणे हाच होता. पण, त्यांच्या योगदानाचा परिणाम म्हणून, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्यकाळातील धोरणनिर्मितीचे सर्व सुख हिरावून घेतले आणि नंतर हा आनंद त्यांची कन्या इंदिरा गांधींनी उपभोगला. लाल बहादूर शास्त्रींचा कार्यकाळ अल्प; पण प्रभावशाली. उर्वरित कालावधीत, इंदिरा गांधींच्या कार्यकाळापर्यंत न्यायालयाचे राजकारण इतके मजबूत झाले की, त्या राजकारणात इंदिरा गांधी हुकूमशाहीचे प्रतीक बनल्या आणि १९७५ मध्ये लोकशाहीला स्थगिती देऊन या देशात आणीबाणी लादली गेली. भारतातील लोकांनी १९७७ मध्ये ज्या प्रकारे इंदिरा गांधींचा लोकतांत्रिक पराभव केला, त्या पराभवातून एक नवीन युग उदयास आले. ज्याने असा संदेश दिला की, काँग्रेस अजिंक्य नाही आणि नेहरू-गांधी कुटुंबाला स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्या कर्तृत्वाचा लाभ मिळाला होता, त्या लाभातून त्यांच्यामध्ये जी हुकूमशाहीची विकृती निर्माण झाली आहे, याविरोधात जनता उभी राहिली होती. १९७७ ते २०१४ हा काळ हा भारतीय राजकारणाचा संक्रमणाचा काळ आहे आणि हा खूप मोठा परिवर्तनाचा काळ ठरला आणि निर्णायकही!
 
 
देशाने अनेक चढउतार पाहिले आणि बदलही घडले. राजकीय ते सामाजिक प्रक्रियेतील बदलांचा तो काळ होता. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात बदलाची ही उत्पत्ती निःपक्षपणे होत आहे. हुकूमशाही हल्ल्यातून या देशाच्या संवेदनशील लोकशाहीला जागृत करण्याचे काम इंदिरा गांधींच्या कार्यकाळात झाले. पण, पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाच्या लोकशाही प्रक्रियेला घराणेशाही प्रक्रियेत रूपांतरित करण्याचे काम केले. परंतु, या देशाची लोकशाही चालवण्याचे काम गांधी, सरदार पटेल आणि आंबेडकरांच्या धोरणांनुसार खऱ्या अर्थाने केवळ नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच केले गेले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकासाठी ‘रोटी, कपडा आणि मकान’ मिळवणे हा ठराव होता. मात्र, २०१४ पर्यंत तरी ही मूलभूत गरज पूर्ण झाली नाही!
 
 
२०१४ पासून जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वाला विरोधकांकडून आव्हान देण्यात आले, तेव्हा तेव्हा मोदींचे व्यक्तिमत्त्व तितक्याच तीव्रतेने उदयास आले. त्यांच्या कार्यशैलीवर जितकी टीका केली गेली, तितक्याच वेगाने त्यांच्या कार्यशैलीत तीव्रता आली. टीकेच्या भाष्याची त्सुनामी आली. पण, विरोधकांना प्रत्येक वेळी तोंडावर पडावे लागले.
 
 
एकेकाळी सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण, सत्य अगदी उलट आहे. नरेंद्र मोदींची स्वीकार्यता अहिंसेच्या मार्गदर्शकांमध्ये जितकी आहे, तितकाच धाक हा दहशतवाद्यांमध्येही आहे. अशी फारच थोडी व्यक्तिमत्त्वे असतात, जी शांततेचा स्तंभ, अहिंसेचे पुजारी असले तरी हिंसक प्रवृत्तीच्या विरोधात श्रीकृष्ण सुदर्शन चक्रासारखी प्रसंगी शत्रूचा नाश करण्यासाठीही पुढे सरसावतात.स्वच्छ भारत असावा, प्रत्येक हाताला काम मिळावे, प्रत्येकाला स्वतःचे घर असावे, त्यात वीज, रस्ते आणि पाण्याची सुविधा असावी, शिक्षण उपलब्ध असावे, डेटासहित इंटरनेटची सुविधा असावी. पण, नरेंद्र मोदी वगळता या दिशेने आजवर कोणत्या नेत्याने किती प्रयत्न केले?
 
 
लक्षात ठेवा, ग्रामसक्षमीकरणाचे काम तेव्हाच साकार होईल, जेव्हा नरेंद्र मोदींसारखे व्यक्तिमत्त्व महात्मा गांधींच्या धोरणांना साकार करण्यासाठी पुढाकार घेईल. कारण, हे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मनुष्याला सशक्त बनवते. प्रत्येक घरात शौचालय, प्रत्येक घरात वीज, प्रत्येक गरिबाला स्वतःचे घर, गरिबांसाठी पेन्शन योजना, शेतकरी, मजूर, रेल्वे रुळ, सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी ‘आयुष्यमान भारत योजना’ प्रदान करणे. त्याचे सकल राष्ट्रीय उत्पादन जसजसे वाढत गेले, तसतसे त्यात समान नागरिकांचा वाटा सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जर त्याच्या वाट्यात कोणी हिस्सेदारी घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्वरित थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोट्यवधी रेशन कार्ड जप्त करण्यात आले, जेणेकरून रेशनचा काळाबाजार थांबू शकेल आणि गरीब सामान्य नागरिकाच्या घरापर्यंत रेशन पोहोचू शकेल. कोट्यवधी लोकांना मोफत ‘एलपीजी’ गॅस सिलिंडर देण्यासाठी, देशातील सक्षम असलेल्या वर्गाला सबसिडी सोडून देण्याचे आवाहन करणे सामान्य नेत्याच्या मेंदूची उपज असूच शकत नाही.
 
 
ज्याने आपल्या गरीब आईला स्वयंपाकघरात धुरामध्ये जळताना पाहिले आहे, त्यालाच ‘धूरमुक्त स्वयंपाकघरा’चा संकल्प जाणवू शकतो. ज्याने आई आणि बहिणींना दुःखात पाहिले असेल, तोच प्रत्येक कुटुंबासाठी सन्मानाचे घर बांधण्याचा संकल्प पूर्ण करू शकतो. जो शेतकऱ्यांच्या समस्यांशी परिचित आहे, तोच शेतकऱ्यांसाठी ‘किसान सन्मान योजना’ राबवू शकतो. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असलेली व्यक्तीच शेजारील देशातील दहशतवाद्यांच्या घरात घुसून हवाई हल्ला करण्याचे धाडस दाखवू शकते. या सर्व गुणवत्तेमुळे, अमेरिकन एजन्सी नरेंद्र मोदी यांना अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्ससारख्या ‘जी-७’ देशांच्या सशक्त राष्ट्राध्यक्षांच्या तुलनेत पात्र असल्याचे सिद्ध करते. ज्या व्यक्तीला कधी-काळी गुजरातच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले, तो एका दशकात गुजरात राजकारणाचा नेता बनतो. ज्या व्यक्तीच्या नवी दिल्लीच्या मार्गात एक दशकासाठी केवळ काटेच अंथरले गेले, ती व्यक्ती दिल्लीत येते आणि त्याच्या शक्तिशाली उपस्थितीची धमक ही जागतिक होते. जेव्हा ती व्यक्ती संयुक्त राष्ट्रात उभी राहते आणि दहशतवादाला आव्हान देते किंवा संपूर्ण मानवी जगाला काही प्रकारचे आवाहन करते, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्यक्षात जाणवतो. अमेरिकेच्या सर्व शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांना स्वतःच्या संकेतांवर सहजपणे चक्रावून टाकण्याची ताकद भारताच्या कोणत्या शासकाला असेल, याची साधी कल्पनाही दशकभरापूर्वी कोणाला करता आली नसती. आधी अणुकरारावर ‘सिंग इज किंग’चा नारा लावला जात होता. आज जागतिक राजकारणात, आपला शेजारी देश चीन असो किंवा पाकिस्तान, भारताला अमेरिकेचा सर्वात जवळचा देश मानला जातो. इथे ‘मोदी इज किंग’ उदयास आले आहेत. परराष्ट्र धोरणावर नरेंद्र मोदींची मुत्सद्देगिरी पूर्ण यशस्वी झाली आणि आज युरोपियन देशांशी भारताचे संबंध ७५ वर्षांमध्ये सर्वोत्तम पातळीवर आहेत. गेल्या पाच दशकांत आपण प्रथमच चीनला जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत. गेल्या सात दशकांत पहिल्यांदाच आपण संपूर्ण जगासमोर पाकिस्तानला भिकारी असल्याचे सिद्ध केले आहे. हे सर्व त्या नरेंद्र मोदींनी शक्य केले, ज्यांनी भारताला ‘नर ते नारायण’ बनवण्याची प्रक्रिया तपासली, समजून घेतली आणि ती सिद्धही केली.
 
 
स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, २१वे शतक हे भारताचे असेल आणि अशा वेळी नरेंद्र मोदींसारखे व्यक्तिमत्त्व उदयास आले आहे, ही सर्वस्वी गौरवास्पद बाब म्हणावी लागेल. विसावे शतक नक्कीच अमेरिकेचे होते. १९वे शतक युरोपचे होते. २१वे शतक गौरवशाली भारताचे असणार आहे आणि भारत त्या गौरवशाली पदावर बसण्यास सक्षम आहे, ते सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदींचे आहे. नरेंद्र मोदींच्या या सक्षम नेतृत्वाकडून महात्मा गांधींजींना जे अपेक्षित होते, ज्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’ म्हटले. ज्याला आपल्या पौराणिक समजुतींमध्ये ‘रामराज्य’ म्हटले जाते, त्या रामराज्याची संकल्पना साकारण्यासाठी ‘अश्वमेध रथ’ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चालत आहे. हा अश्वमेध रथ थांबवण्याची क्षमता ना पाकिस्तानकडे आहे, नाही चीन त्या क्षमतेला रोखण्याच्या स्थितीत आहे. भारतात शेकडो वर्षांनंतर ही परिस्थिती आली आहे, म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रामराज्य, राम मंदिराचे बांधकाम, ‘कलम ३७०’ रद्दबातल ठरले आहे. तसेच सामान्य नागरिकांच्या हितासाठी, ‘तिहेरी तलाक’ विरोधी कायदे संसदेत मंजूर केले जातात.
 
 
भारताला खऱ्या अर्थाने वैश्विक गौरवशाली पदावर विराजमान करण्याचे सामर्थ्य या अमृतमहोत्सवी वर्षात निश्चितपणे नरेंद्र मोदींमध्येच आहे! त्यांना दीर्घायु लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
 
- आचार्य पवन त्रिपाठी
(लेखक भाजप मुंबईचे उपाध्य आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@