मुंबईतील प्रत्येक पोलीस स्थानकात निर्भया पथक

15 Sep 2021 17:25:18

Mumbai Police_1 &nbs
मुंबई : साकीनाकामध्ये झालेल्या बलात्काराप्रकरणी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका करण्यात आली. यानंतर आता मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्रत्येक पोलिस स्थानकात आता महिला सुरक्षा पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाला निर्भया पथक असे नाव देण्यात यावे, अशी सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केली आहे.
 
 
प्रत्येक पोलीस ठाण्यातील गस्ती पथकास निर्भया पथक असे संबोधले जावे, अशी सूचनाही मुंबई पोलीस आयुक्तांनी केली आहे. या निर्भया पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, एक महिला तसंच एक पुरुष अंमलदार आणि एक ड्रायव्हर अशा मनुष्यबळाचा समावेश असेल. तसेच, निर्भया पथकासाठी प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये एक विशेष डायरी केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक तपशील स्वतंत्रपणे उपस्थित असेल. जे वेळोवेळी नोडल अधिकारी तपासतील, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0