मुंबई इंडियन्सचं धमाल मराठी गाणं पाहिलंतं का?

15 Sep 2021 12:34:46
MI _1  H x W: 0
 


मुंबई : IPL 2021 इंडियन प्रीमियर लीग सीझन १४चा दुसरा हिस्सा आता १९ सप्टेंबरपासून सुरू होतोय. चेन्नई सुपर किंग्च्या स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजाला मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वात पहिल्यांदाच फीट घोषित कण्यात आले आहे तर डु प्लेसिसही रविवारी होणाऱ्या सामन्यात मैदानात उतरण्याची तयारी करत आहे.
 
 
जडेजा गेल्या शनिवारीच युएईत पोहोचला. या सिझनचा पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई असा होणार आहे. त्यामुळे या सिझनच्या दुसऱ्या भागाची सुरुवात एकदम दमदार असणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सतर्फे आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी एक मराठी गाणं तयार केलं आहे.



आपली पोरं? भारी, आपली टीम? भारी, आपली फॅमिली? लय भारी म्हणत आयपीएल येतेयं. पलटण तयार रहा, अशा छान कॅप्शनसह हे नवे गाणे प्रसारित केले आहे. पहिला सामना कोण जिंकणार याची उत्सुकता आता सर्व क्रिकेटप्रेमींना आहे.




Powered By Sangraha 9.0