केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! पगारात पुन्हा वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2021
Total Views |
Indian Currency _1 &




नवी दिल्ली : गणेशोत्सवाच्या निमित्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि DR (Dearness Relief) मध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात यामुळे शहरनिहाय्य वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांचा इतर भत्ताही वाढला आहे.
 
 
 
सर्वात जास्त फायदा HRA मध्ये झाला. दरम्यान, कोरोना महामारीचा फटका नोकरदारवर्गाला बसला होता. जानेवारी २०२०पासून जून २०२१पर्यंत डीए आणि डीआरसह इतर सर्व भत्त्यांमध्ये कुठलीही वाढ झाली नव्हती. मात्र, अनलॉक झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे.
 
 
 
केंद्राने एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २८ टक्क्यांत वाढ करण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने एक जुलैपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि डीआरमध्ये ११ टक्के वाढीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. केंद्र सरकारच्या ४८ लाखांपेक्षा जास्त क्रमचाऱ्यांना आणि ६५ लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
 
 
DA चा नवीन दर आता १७ टक्क्यांवरून वाढून २८ टक्के झाला. डीएसह केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हाऊस रेंट अलाऊंस (HRA) मध्येही बदल झाला आहे. सरकारने HRA ला वाढवून २७ टक्के केला आहे. डीआर आणि डीएसोबतच एचआरए वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आहे. एकप्रकरणारे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली आहे.
 
 
 
एचआरएमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी १-२ टक्केंनी वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाच्या आदेशानुसार, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरांनुसार २७ टक्के, १८ टक्के आणि ९ टक्के HRA मिळेल. सध्या तिन्ही वर्गांसाठी २४ टक्के, १६ टक्के आणि ८ टक्के इतका एचआरए मिळतो. ५४००, ३६०० आणि १८०० असा तिन्ही कॅटेगरीसाठी कमीतकमी एचआरए होईल.



@@AUTHORINFO_V1@@