मुंबईचा दहशतवादी जान मोहम्मदचे होते 'डी' कंपनीशी संबंध; मिळून रचणार होते 'हा' कट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2021
Total Views |
delhi _1  H x W
दिल्ली - पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे मोठे षड्यंत्र उधळून लावत दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी ४७ वर्षीय जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालिया आहे. व्यवसायाने चालक असलेला समीर मुंबईचा रहिवासी आहे. समीर कडे दहशतवादी कटकारास्थानासाठी शस्त्रे गोळा करण्याचे आणि हल्ले करण्यासाठी लक्ष्य ओळखण्याचे काम देण्यात आले होते.
 
समीरच्या चौकशीदरम्यान समोर आले आहे की, २००१ मध्ये त्याला लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याचा डी कंपनीशी संबंध असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. जान मोहम्मद हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमच्या थेट संपर्कात होता. त्याच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे बोलायचे. त्याच्यावर दहशतवाद्यांना आयडी आणि रसद पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अटकेपूर्वी त्याने त्याचे सर्व मोबाईल डिलीट केले होते. तपास यंत्रणेच्या मते, अनीस आयएसआयच्या या षडयंत्राला आर्थिक मदत करत होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी प्रयागराजचे झीशान कमर आणि दिल्लीच्या जामिया नगरचे ओसामा उर्फ ​​सामी हे पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित होते. दोघेही ओमानमार्गे कराचीजवळील थट्टा दहशतवादी कॅम्पमध्ये पोहोचले होते. येथेच मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या अजमल कसाबलाही प्रशिक्षण देण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@