अमेरिकेच्या उलट्या बोंबा; अफगाणिस्तानला मदत देऊन सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न

    दिनांक  14-Sep-2021 15:02:06
|
america _1  H xकाबुल -
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. या सरकार स्थापनेच्या एका आठवड्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानला आर्थिक मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी ६४ दशलक्ष अमेरिका डाॅलर म्हणजेच सुमारे ४७१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
 
 
यूएस स्टेट डिपार्टमेंट आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून (यूएसएआयडी) हा निधी यूएन एनजीओ आणि एजन्सीसह स्वतंत्र संस्थांना अफगाणिस्तान नागरिकांच्या मदतीकरिता हस्तांतरित केला जाईल. सोमवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात, यूएसएआयडीने या मदतीबद्दल सांगितले आहे. अफगाणिस्तानला कोरोनाव्हायरस महामारी, असुरक्षितता आणि नैसर्गिक आपत्तीनंतर आता सर्वात धोकादायक काळाला सामोरे जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला पोषक वातावरण प्रदान करण्याची गरज आहे. महिला, पुरुष आणि कामगारांना चांगले वातावरण प्रदान करणे आवश्यक आहे. जेणेकरून ते स्वतंत्रपणे काम करू शकतील. हे योगदान अफगाण लोकांसाठी अमेरिकेच्या बांधिलकीची पुष्टी करते, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
 
यूएसएआयडीने अमेरिकन सरकारच्या प्रतिसादाचे नेतृत्व करण्यासाठी अफगाणिस्तानच्या बाहेर स्थित आपत्ती सहाय्य प्रतिसाद दल (डीएआरटी) देखील सक्रिय केले आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने एका प्रसिद्धीपत्रकात दावा केला आहे की अमेरिकेने केवळ २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये सुमारे ३३० दशलक्ष डॉलर्सची मानवतावादी मदत दिली आहे. यूएसएआयडीने म्हटले आहे की, ते अफगाणिस्तानच्या असुरक्षित लोकसंख्येला अत्यावश्यक मदत आणि त्यांचे दुःख कमी करण्यासाठी मदत सुरू ठेवणार आहेत. एक आठवड्यापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले अंतरिम सरकार स्थापन केले. यामुळे परिषदेचे प्रमुख आणि पंतप्रधान मुल्ला हसन अखुंद झाले आहेत. ते तालिबानच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्था 'रहबारी शूरा'चे प्रमुख होते. त्याचबरोबर अब्दुल गनी बरदार यांना उपपंतप्रधान बनवण्यात आले आहे. संरक्षण मंत्री म्हणून मुल्ला याकूब आणि लष्करी प्रमुख म्हणून अल्लाह मुल्ला फजल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.