पवार रा.स्व. संघाचं कौतूक करताना नेमकं काय म्हणाले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2021
Total Views |


Sharad Pawar _1 &nbs

 
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भाजपची संघटनात्मक ताकद, विचारधारेवर चालण्याची शिस्त अन्य कुठल्याही पक्षांपेक्षा आजही कायम आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकतेच केले. 'मुंबई तक'चे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि साहील जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल उल्लेख केला. पूरेपूर विरोधी विचारसरणी असलेल्या पवारांनी रा.स्व.संघ आणि भाजपचे कौतूक केल्याने त्यांच्या या वक्तव्याची चर्चा देशातील राजकारणात झाली.
 
 
राजदीप सरदेसाई यांनी हिंदूत्ववादी संघटनांच्या मुद्द्यांवरून पवारांना बोलतं करण्याचा प्रयत्न यावेळी झाला.. "एकेकाळी हिंदूत्ववादी संघटना या देशातील राजकारणात कधीच नव्हत्या. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. याचं नेमकं कारण काय?", असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर पवार म्हणाले, "प्रागतिक विचाराच्या शक्ती तुलनात्मक दृष्ट्या दुबळ्या झाल्या याचा फायदा कोण घेऊ शकते? तर अतिरेकी भूमिका घेऊन विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करणारे आणि त्यासाठी कटीबद्ध असे लोक असतात त्यांना यश मिळते. एक गोष्ट मान्य केली पाहीजे की, भाजप जसा अंतर्गत बऱ्याच गोष्टीत काँग्रेसच्या जवळ जायला लागला आहे. पण त्यांच्याकडे असलेल्या काही संघटना आहेत. त्या संघटनेमध्ये काही कमिटेड लोक आहेत."
 
 
"मला आठवतंयं नागालँडमध्ये मी विमानतळावर होतो. तिथे एक गृहस्थ मला दिसले. मला वाटलं मी यांना कुठे तरी पाहिलंयं, त्यांचं नाव सांगंत नाही. नंतर मला लक्षात आलं की हा माझ्या वर्गात होता. आम्ही एकत्रच होतो. मी त्याला विचारलं, तू इथे कसा काय?, तो म्हणाला मी इथे २० वर्षे आहे. त्याला विचारलं तू काय करतोय इथं?, त्यावर तो म्हणाला, 'मला संघानं इथं काम करायला सांगितलंयं'. मी म्हटलं कॉलेज सोडल्यानंतर तू इथंचं आहेस का?, मग म्हटलं तुझं घर दार कोण चालवंतं?, तो म्हणाला 'संघाकडून मला दोनशे रुपये मिळतात. माझी इथली व्यवस्था संघाचेच लोक करतात.'", हा किस्सा पवारांनी यावेळी सांगितला.
 
 
पवार म्हणाले, "लक्षात घ्या त्यावेळी २० वर्षे नागालँडमध्ये जी काही विचारधारा मला पसंत नसेल, पण त्यांना पसंत असेल तर त्यासाठी एवढा त्याग, त्यासाठी समर्पणाची तयारी असलेला संच त्यांच्याकडे असेल तर ही जमेची बाजू आहे." यावर थांबवत सरदेसाई पवारांना म्हणाले, आज जी काही भाजपची ताकद आहे ती काही 'नरेंद्र मोदींची का?' त्यावर पवारांनी उत्तरं दिलं की, "भाजपची जी संघटनात्मक ताकद आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मोदी हा एक फॅक्टर आहे तो दुर्लक्षित करून चालणार नाही. पण निव्वळ तोच फॅक्टर कारणीभूत आहे, असेही म्हणून चालणार नाही. आज संबंध संच, बांधिलकी असलेला वर्ग हे सर्व कारणीभूत आहेत."
 
 
"निवडणूकांसाठी तडजोड करण्याचं तारत्मय हल्ली भाजपतर्फेही दाखवले जाते. यापूर्वी परिस्थिती वेगळी होती. जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी विधीमंडळात होते. अतिशय प्रामाणिक आणि कमिटेड माणूस, पण त्या चौकटीबाहेर ते कधी गेले नाहीत. सदनात एखाद्या प्रश्नावर मतदान करायचे असेल तर त्यांच्या त्या विचारधारेत बसत असेल तर मतदान करायचे नाहीतर बहिष्कार टाकायचे. एवढी कमिटमेंट त्यांच्यातील लोकांमध्ये होती. आज ही कमिटमेंट आहे का?, त्याबद्दल माझं मत आहे की मला ती दिसत नाही. आज त्यांच्या संघटनेमध्ये ढिसाळपणा आलेला दिसतो. पण तरीही दुसऱ्या बाजूला जे पक्ष आहेत त्यांच्याशी तुलना केली तर संघटना ही आजही जमेची बाजू ठरेल.", असेही पवार म्हणाले.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@