पावसानं शेतीचं नुकसान गुरंही गेली वाहून

वाड्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी

    दिनांक  14-Sep-2021 17:14:41
|

NNN_1  H x W: 0

वाडा : पालघरच्या वाडा तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थीती निर्माण झाली आहे. महापुरात कित्येक शेतकऱ्यांचे शेतबांध वाहून गेले आहेत. शेतबांधाना खांडी पडल्या आहेत. भात लागवड केलेल्या शेतजमीनीत मातीचा थर साचून भात लागवडीचे नुकसान झाले आहे.
 
 
मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने उभे असणाऱ्या हलवार भातपीक आडवे होऊन भातपीकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती शेतकरी प्रभाकर पाटील (कोंढले) यांनी दिली. तानसा धरण तुडुंब भरले असून ३८ दरवाचे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीच्या पाणी पात्रात अचानकपणे वाढ होऊन तालुक्यातील कोंढलेतील शेतकरी अनिल बबन पाटील या शेतक-याची एक म्हैस नदीकाठी चरत असतांना वाहुन गेल्याची घटना सोमवारी (ता.१३) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
 
 
 
दरम्यान, आणखी दोन म्हशी वाहून जात असताना या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने त्यांना वाचवता आले. शेतकऱ्याला किमान ५० हजारांची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा धरण तुडुंब भरले असुन तालुक्यातील वैतारणा नदी काठावरील कळंभे, तिळसे, पाली, गातेस, कोनसई, आब्जे, आंबिस्ते, बुरांडे, वसुरी, घोडमाल, आवंढे, सांगे, नाणे, व गालतरे तर तानसा नदी काठावरील बेरशेती, उसर, चांबळे, मेट, डाकिवली, केळठण, गोराड, निंबवली या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
गावकऱ्यांचा अधिकाऱ्यांविरोधात संताप
 
 
सरकारी अधिकारी असंवेदनशील असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष व वस्तुनिष्ठ पंचनामे होत नाहीत. त्यामुळे अनेक शेतक-यांना योग्य नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी केला आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.