भारत- पाक मालिकेबद्दल पीसीबीच्या नव्या अध्यक्षांनी केले 'हे' वक्तव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2021
Total Views |

ramiz raja_1  H
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस याबद्दल चर्चा होत होती. ही बातमी बाहेर येताच पाकिस्तानी क्रिकेट संघामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. टी - २० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर केल्यानंतर लगेचच संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यामधील मतभेद यामुळे सर्व जगासमोर आले. आता रमीज राजा यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळली आहेत.
 
 
पीसीबीचे नवे अध्यक्ष रमीझ राजा यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय मालिका होणार का? असा प्रश्न विचारला असता सांगितले की, "सध्या तरी हे अशक्य आहे, कारण राजकारणाचा खेळांवर मोठा परिणाम पडतो. आता ती परिस्थिती नाही. आम्ही यासंदर्भात कोणतीही घाई करणार नाही. सध्या आम्ही पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहोत." असे स्पष्ट केले. रमीझ राजा हे पुढचे ३ वर्ष अध्यक्ष पद सांभाळतील. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता पाकिस्तानने पीसीबीमध्ये बरेच बदल केले आहेत.
 
 
दुबई येथे होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याबद्दल विचारले असता सांगितले की, "जेव्हा मी पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंना भेटलो, तेव्हा मी त्यांना काही समीकरणे बदल्याचा सल्ला दिला. या सामन्यासाठी संघ १०० टक्के तयार पाहिजे आणि संघाने चांगली कामगिरी केलीच पाहिजे. आपण समस्यांना सामोरे जायला आणि सामना गमवायलादेखील तय्यार असले पाहिजे. मी त्यांना सांगितले आहे की, संघातील तुमच्या जागेचा विचार करू नका, निर्भीडपणे खेळ."
@@AUTHORINFO_V1@@