ऑस्ट्रेलियाचा 'हा' खेळाडू झाला पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक

एकेकाळी टी - २० क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांना केले होते हैराण

    दिनांक  13-Sep-2021 18:59:22
|

pakistan_1  H x
मुंबई : दुबई येथे होणाऱ्या आगामी टी - २० विश्वचषक स्पर्धेसाठी प्रत्येक संघ जोरदार तयारी एकरात आहे. अशामध्ये पाकिस्तानी क्रिकेटमध्ये मात्र वेगळीच उलथापालथ चालू आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर होताच मुख्य प्रशिक्षक म्हणून मिसबाह उल हक आणि गोलंदाज प्रशिक्षक म्हणून वकार युनीस यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रमीज राजा यांनी अधिकृतरित्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली.
 
 
या सर्व घडामोडीनंतर पीसीबीने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांची मुख्य प्रशिक्षक पदी निवड केली आहे. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघ हेडन हा प्रमुख खेळाडू होता. एकदिवसीय तसेच टी - २० सामन्यांमध्ये त्याच्या फलंदाजीचा मोठा दरारा होता. भारतीय गोलंदाजांना हैराण करणाऱ्या फलंदाजांपैकी तो एक होता. त्यामुळे आता पाकिस्तानने मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा त्याच्याकडे सोपवली आहे.
 
 
पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू व्हेरनॉन फिलँडरची निवड करण्यात आली आहे. २०१९मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेला फिलँडर पहिल्यांदाच प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना ६४ कसोटीत २२४ विकेट्स तर ३० एकदिवसीय सामन्यात ४१ विकेट्स घेतल्या आहेत. आता पाकिस्तानने उभा केलेला हा नवा संघ येत्या काळात काय कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.