धर्मांधांचा ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2021
Total Views |

agralekh_1  H x
 
 
नुकताच केरळच्या कोट्टायममधील सायरो मलबार चर्च पाला धर्मप्रांताचे बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांनी ‘लव्ह जिहाद’ संकल्पनेचा पुनरुच्चार केला, त्याचबरोबर ‘नार्कोटिक्स जिहाद’ संकल्पनेची देशाला नव्याने ओळख करुन दिली.
 
 
देशात दीर्घ कालावधीपासून बिगर मुस्लीम मुली-महिलांविरोधात इस्लामी कट्टरपंथीयांकडून सुरू असलेल्या ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा गाजत आला. ‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे पाहता उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या चार भाजपशासित राज्यांनी याविषयी कायदेही केले. त्यानुसार, फसवून, बळाने, आमिष दाखवून वा फूस लावून एखाद्या मुलीशी विवाह करुन तिचे धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली. तत्पूर्वी 2009 साली केरळ उच्च न्यायालयाने सर्वात आधी ‘लव्ह जिहाद’ची संकल्पना मांडली होती, तसेच सरकारला त्याविरोधात कायदे तयार करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चाही झाली, अनेकांनी आपापली मते व्यक्त केली, तथाकथित पुरोगामी-धर्मनिरपेक्ष-उदारमतवाद्यांनी ‘लव्ह जिहाद’सारखा प्रकार अस्तित्वात नसल्याचे म्हटले, तर धर्मांध इस्लामी आक्रमणाचा आधुनिक काळातही अनुभव घेणार्‍यांनी ‘लव्ह जिहाद’मुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या मुली-महिलांना समोर आणले, तर कित्येकदा ‘लव्ह जिहाद’विरोधात प्रत्यक्ष, प्रसारमाध्यमांतून वा इंटरनेटद्वारे ‘ऑनलाईन’ आंदोलने-निदर्शने झाली, बिगर मुस्लीम समाजात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृतीचे प्रयत्न केले गेले. मात्र, इतके होऊनही धर्मांध इस्लामानुयायांकडून ‘लव्ह जिहाद’च्या कारवाया थांबलेल्या नाहीत, उलट त्यात जिहादच्या अन्य व नवनव्या प्रकारांचाही समावेश होत आहे. नुकताच केरळच्या कोट्टायममधील सायरो मलबार चर्च पाला धर्मप्रांताचे बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांनी ‘लव्ह जिहाद’ संकल्पनेचा पुनरुच्चार केला, त्याचबरोबर ‘नार्कोटिक्स जिहाद’ संकल्पनेची देशाला नव्याने ओळख करुन दिली. केरळमध्ये कॅथलिक मुली ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’ला बळी पडत असल्याचे ते म्हणाले. मात्र, इस्लामी कट्टरपंथी असे का करतात आणि यामागचा त्यांचा उद्देश काय, याबद्दलही बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांनी विधान केले आणि ते इस्लामी धर्मांधांचे वास्तव उघड करणारे आहे.
 
 
“जिथे हत्यारांचा वापर करता येत नाही, तिथे नशिल्या पदार्थांचा वापर करून कॅथलिक मुलींना जाळ्यात अडकवले जाते, त्यांचे धर्मांतर केले जाते.केरळमध्ये ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’ला मदत म्हणून एक गट काम करत आहे. काही लोक न्याय, शांती आणि इस्लामसाठी युद्ध आणि संघर्ष अत्यावश्यक असल्याचे सांगत मूलतत्त्ववादाला प्रोत्साहन देत आहेत. जगभरात इस्लामी कट्टरपंथी वंशवाद, द्वेष आणि घृणा वाढवत आहेत. त्याद्वारे मुस्लीम विचार लागू करण्याची योजना राबवली जात आहे. मुस्लीम विचारधारा लागू करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले गेले, जेणेकरून कोणीही बिगरमुस्लीम राहू नये,” असे बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांनी म्हटले आहे. इथे हत्यारांचा वापर करता येत नाही, हा मुद्दा महत्त्वाचा म्हटला पाहिजे. कारण, आपण पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान वा अन्य मुस्लीमबहुल देशांकडे पाहिल्यास तिथे बिगरमुस्लिमांविरोधात सर्रास हत्यारांचा वापर केला जातो, हत्यारांच्या बळावर बिगरमुस्लिमांच्या मुली-महिलांना पळवून नेले जाते, त्यांच्यावर अत्याचार-बलात्कार केले जातात, त्यांचे धर्मांतर केले जाते. इथे बिगरमुस्लिमांची संख्या नगण्य असल्याने त्यांच्याकडून धर्मांध इस्लामींचा पुरेसा प्रतिकारही केला जात नाही. मात्र, नव्वदच्या दशकातील काश्मीर खोर्‍यातील भयावह घटनाक्रम वगळता भारतात अजूनही इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना पोषक ठरेल व बिगरमुस्लिमांविरोधात हत्यारांचा वापर करता येईल, इतकी इस्लामानुयायांची संख्या वाढलेली नसावी. म्हणूनच त्याऐवजी त्यांच्यातील कट्टरपंथीयांकडून बिगर मुस्लिमांच्या मुली-महिलांविरोधात ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’चा वापर केला जातो व हत्यारांचा वापर करण्याइतकी संख्या झाल्यास इथेही मुस्लीमबहुल देशांप्रमाणेच धर्मांधांकडून हैदोस घातला जाईल व बिगरमुस्लिमांना संपवले जाईल, असे बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांच्या विधानांतून सूचित होते. अर्थात, फसवणुकीने किंवा बळजबरीने केलेली धर्मांतरे हा ख्रिश्चनांचाही इतिहास आहेच, पण आता त्यांनाही त्यांच्यासारखीच कृत्ये करणार्‍या इस्लामी कट्टरपंथी जिहादींची भीती वाटते, हेदेखील यातून स्पष्ट होते. इतकी वर्षे धर्मांध मुस्लिमांकडून प्रेमाचा बहाणा करुन बिगरमुस्लीम मुली-महिलांच्या धर्मांतराचे उद्योग केले गेले. पण, आता त्यांनी त्यापुढची पायरी गाठली असून बिगरमुस्लीम मुली-महिलांच्या धर्मांतरासाठी नशिल्या पदार्थांचा, अमली पदार्थांचा किंवा ड्रग्सचा वापर केला जात आहे, असे यातून दिसते. नशिल्या पदार्थांचे मानवी शरीराला होणारे अपाय नव्याने सांगण्याची गरज नाही, यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या मुला-मुलींची कितीतरी उदाहरणे आहेत. तोच प्रकार इस्लामी कट्टरपंथीय अवलंबत असतील, तर त्याविरोधात ठोस उपाययोजनाही राबवल्या पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे, नशिल्या पदार्थांची उपलब्धता बहुतांशवेळा बेकायदेशीर मार्गानेच होते, त्यामुळे त्याला जबाबदार त्या त्या राज्य सरकारांना, प्रशासनाला व पोलिसांनाही धरले पाहिजे, जसे की केरळ; तरच याला अटकाव होऊ शकतो, अन्यथा ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’चा फास बिगरमुस्लीम मुली-महिलांच्या गळ्याभोवती आवळतच जाईल.
 
 
मात्र, केरळ सरकार स्वतःहून यात पुढाकार घेईल, असे वाटत नाही. कारण, बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांच्या ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’बद्दलच्या विधानावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी, ‘धर्माच्या आधारावर फूट पाडणारे’ असे म्हणत टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी. टी. थॉमस यांनीही, अशाप्रकारच्या विधानांमुळे राज्याची सामाजिक वीण उसवेल, असे म्हटले. म्हणजेच, केरळातील सत्ताधारी डावी आघाडी व विरोधी काँग्रेस दोघांनाही ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’चे कसलेही गांभीर्य असल्याचे दिसत नाही. त्यांना फक्त मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची फिकीर असून अन्य धर्मीय उद्ध्वस्त झाले, तरी त्यांना ते चालणार आहे. कदाचित मुस्लीम व इस्लामी कट्टरपंथीयांचेही समर्थन करणार्‍या त्यांच्या याच भूमिकेमुळे केरळातील मुस्लीम कोऑर्डिनेशन कमिटीसह अन्य मुस्लीम संघटनांनी बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांच्या घराबाहेर कोरोना काळातही शेकडोंच्या संख्येने जमून निदर्शने केली, तसेच त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्र यांनी मात्र बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांचे समर्थन केले असून ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’ गंभीर मुद्दा असून यावर समाजाने चर्चा केली पाहिजे, असे म्हटले आहे. डावी आघाडी किंवा काँग्रेससारखे पक्ष ‘लव्ह अ‍ॅण्ड नार्कोटिक्स जिहाद’चा मुद्दा नाकारत आहेत, तर जमिनी स्तरावर कार्य करणार्‍या भाजपला त्याचे अस्तित्व मान्य आहे व तो पक्ष त्याविरोधात भूमिकाही घेत आहे. मात्र, एक समाज म्हणून आपणही याविषयात बिगरमुस्लिमांमध्ये जनजागृती केलीच पाहिजे. एक समाज, एक राष्ट्र म्हणून भारताच्या अस्तित्वासाठी त्याची गरज आहे. अन्यथा, धर्मांध इस्लामी ताकदी समाजाचे आणि राष्ट्राचे लचके तोडण्यासाठी टपलेल्याच आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@