मुंबई : मुंबईच्या वडापावची चर्चा ही देशभरासह सातासमुद्रापारही आहे, हे सर्वश्रुत आहे. नुकतेच ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी मुंबईत भेट दिली. यावेळी त्यांनी केलेल्या हटके ट्विटची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. त्यांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात मुंबईच्या वडापावचा आस्वाद घेतानाचा एक फोटो त्यांनी शेअर केला. सध्या ट्विटरवर हा फोटो आणि त्याखाली दिलेले कॅप्शन चांगलेच चर्चेत आले आहे.
फोटो शेअर करत अॅलेक्स एलिस यांनी, 'मुंबईत वडापाव खाण्याची नेहमीच वेळ येत असते, लई भारी' असे आकर्षक कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे 'लई भारी' हे मराठीत लिहिल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले. एलिस हे भारतातील अनेक पदार्थ चाखून बघत आहेत. या संदर्भात ते आवर्जून पोस्टही टाकतात. एलिस सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या उच्च अधिकाऱ्यांना भेट घेत आहेत.