पाकिस्तानात मोठे आर्थिक संकट!

    दिनांक  11-Sep-2021 16:39:54
|
Pak _1  H x W:इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती बऱ्याच काळापासून वाईट आहे. आता स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या (एसबीपी) कमी होत असलेल्या परकीय चलन साठ्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बऱ्याच काळापासून वाईट आहे. आता स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या (एसबीपी) कमी होत असलेल्या परकीय चलन साठ्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे.


सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानच्या विदेशी चलन साठ्यात ०.६१ टक्क्यांची घट झाली. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार, ३ सप्टेंबरपर्यंत एसबीपीकडे परकीय चलन साठा २,००२२.२६ दशलक्ष डॉलर्स इतका होता. जो २७ ऑगस्ट रोजी २०१४५ दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत १२३ दशलक्ष डॉलर्सने कमी आहे. बाह्य कर्जाची परतफेड केल्यामुळे ही घट झाल्याचे मध्यवर्ती बँकेचे म्हणणे आहे.


एका अहवालानुसार, पाकिस्तानकडे २७१०.२६ दशलक्ष डॉलर्सचे परकीय चलन आहे, ज्यात एसबीपी व्यतिरिक्त इतर बँकांकडे असलेले निव्वळ साठा आहे. बँकांकडे एकूण ७०८ डॉलर्स दशलक्ष निव्वळ साठा आहे. यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेकडे परकीय चलनसाठा वाढून २०१० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स झाला होता. त्या वेळी देशाला २४ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून २७५१.८ दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत मिळाली होती.


पाकिस्तानने अडीचशे दशलक्ष डॉलर्सचे घेतले कर्ज

पाकिस्तानने युरोबॉन्डद्वारे २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज घेतले आहे, ज्यासाठी त्याने सावकारांना चांगला व्याज दर दिला आहे. ९ जुलै २०१९ रोजी पाकिस्तानला आयएमएफकडून ९९१४ दशलक्ष डॉलर्सचे पहिले कर्ज मिळाले, ज्यामुळे साठा वाढवण्यात मदत झाली. यानंतर, डिसेंबर २०१९ मध्ये, आयएमएफने सुमारे ४५४ दशलक्ष डॉलर्स कर्जाचा दुसरा हप्ता जारी केला.

एसबीपीने शंभर दशलक्ष डॉलर्सहून जास्त परकीय कर्जाची केली परतफेड
चीनने केलेल्या २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या मदतीने पाकिस्तानच्या साठ्यातही काही वाढ झाली होती. त्याचवेळी, २०२० मध्ये, एसबीपीने शंभर दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त परकीय कर्जाची परतफेड केली. मोठ्या प्रमाणावर कर्जाची परतफेड केल्यामुळे त्याचा परकीय चलन साठा कमी झाल्याचे बँकेचे म्हणणे आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.