दिल्ली कुणामुळे बुडाली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2021
Total Views |

Delhi _1  H x W




नवी दिल्ली : धावपट्टीवरून विमानतळाच्या गेटपर्यंत पाणी भरले, एक आंतरराष्ट्रीय आणि ४ देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत; ४६ वर्षात प्रथमच इतका पाऊस दिल्लीत पडला आहे. दिल्लीत शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ४६ वर्षांनी इथे इतका पाऊस पडला आहे. मोतीबाग, आर के पुरम यासह दक्षिण दिल्लीच्या अनेक भागात रस्ते जलमय झाले असून येथून ये -जा करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.



 
दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल (आयजीआय) विमानतळाच्या परिसरातही पावसाचे पाणी भरले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विमानतळाच्या परिसराव्यतिरिक्त, धावपट्टीतही पाणी भरले आहे आणि पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या विमानांची चाके त्यात बुडलेली दिसत आहेत. विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की एक आंतरराष्ट्रीय आणि चार देशांतर्गत उड्डाणे जयपूर आणि अहमदाबाद विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत. दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) अधिकारी म्हणतात की ज्या भागात पाणी साचण्याची समस्या समोर आली आहे, तेथे मशीनद्वारे पाणी काढले जात आहे.




दक्षिण दिल्लीच्या अंडरपासमध्ये पाणी साचल्याने रस्ता बंद झाला आहे.
दिल्लीत एकीकडे यंदाच्या पावसाने १८ वर्षांचा विक्रम मोडला आणि ४६ वर्षातील सर्वाधिक पावसाचा विक्रमही झाला आहे. १ जूनपासून येथे मान्सून सुरू होतो. संपूर्ण पावसाळ्यात सरासरी पाऊस ६४९.८ मिमी आहे. १ जून ते १० सप्टेंबर पर्यंत सरासरी ५८६.४ मिमी पाऊस पडतो. यावेळी १० सप्टेंबर रोजी हा आकडा १००५.३ वर पोहोचला. शनिवारपर्यंत दिल्लीत ११०० मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी २००३ मध्ये १०५० मिमी पाऊस झाला होता. हा विक्रमही यंदा मोडला गेला. १९७५ मध्ये दिल्लीत ११५० मिमी पावसाची नोंद झाली होती. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर हा ४६ वर्षांचा रेकॉर्डही मोडला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीचे रस्ते इतके पाण्याने भरले आहेत की बसची चाकेही बुडू लागली आहेत.





दिल्ली-एनसीआरच्या 'या' भागांत रेड अलर्ट
हवामान विभागाने दिल्लीत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे, ज्याचा परिणाम बहादूरगढ, गुरुग्राम, लोनी देहाट, हिंडन हवाई दल स्टेशन, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपराऊला, चरखी दादरी, मट्टनहेल, झझार, सोनीपत, रोहतक, मोदीनगर, हापुड, दिल्ली एनसीआर या भागांचा यात समावेश होतो.




कुठल्या भागात साचले पाणी?
मधु विहार, हरी नगर, रोहतक रोड, बदरपूर, सोम विहार, आयपी स्टेशन जवळ रिंग रोड, विकास मार्ग, संगम विहार, मेहरौली-मदारपूर रोड, पुल प्रल्हादपूर अंडरपास, मुनारिका, राजपूर खुर्द, नांगोली आणि किरारी


@@AUTHORINFO_V1@@