या मुर्दाड सरकारसाठी हा फक्त एक आकडा : चित्रा वाघ

11 Sep 2021 12:48:20

chitra wagh s_1 &nbs
मुंबई : मुंबईमध्ये साकीनाका परिसरात झालेल्या ३५ वर्षीय बलात्कार पिडीतेचा शनिवारी राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी झालेल्या या घटनेनंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरले. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली. यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधताना 'या मुर्दाड सरकारसाठी हा फक्त एक आकडा आहे,' असे म्हणत टीका केली.
 
 
 
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना नाही वाचवू शकलो तुला." असे म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केले.
 
साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले. एका टेम्पोमध्ये हा सगळा प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. संबंधित घटना ही गुरुवारी मध्यरात्री ९ ऑगस्ट पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली होती.
 
 
आरोपीने भररस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये हे कृत्य केलं होतं आणि त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याचे आढळले. संबंधित टेम्पोमध्येही रक्त आढळले आहे. या संदर्भात काही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौहानला अटक केली.
 
Powered By Sangraha 9.0