चुकूनही विकत घेऊ नका 'असे' बाटलीबंद पाणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2021
Total Views |
Bisleri _1  H x


मुंबई : BIS अर्थात भारतीय मानक ब्यूरोने ०९ सप्टेंबर २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे भारतीय मानक १४५४३ नुसार " बाटलीबंद पेयजलावर" ISI चिन्हाचा गैरवापर तपासण्यासाठी सक्तीचे छापे आणि जप्तीची कारवाई केली. मेसर्स मदर बेव्हरेजेस, (युनिट १० ते १६, स्वामी विवेकानंद अपार्टमेंट, टेमघर पाइपलाइन रोड, भिवंडी -४२१३०२, ठाणे), च्या आवारात टाकलेल्या छाप्यात भारतीय मानक ब्युरोच्या प्रमाणित चिन्हाचा (आयएसआय मार्क) गैरवापर आढळला.


मेसर्स मदर बेव्हरेजेस, वैध परवान्याशिवाय आणि CM/L.No-७२००१६८२०५ आणि CM/L.No-३७२३५६० सारखे विविध परवाना क्रमांक वापरून ZIP Aqua, Oxy Clear, Reeha, ZEF Aqua, OXYREO या ब्रँडचे सीलबंद पेयजल BIS चिन्हाचा गैरवापर करून विकत असल्याचे आढळले. या छाप्यात भारतीय मानक १४५४३: २०१६ नुसार १ लीटरच्या सुमारे ३६० बाटल्या आणि ५०० मिलीलिटरच्या ८५२ बाटल्या तसेच विविध प्रकारचे लेबल/स्टिकर्स जप्त करण्यात आली. बीआयएस मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकात श्री. अर्जुन.टी आणि श्री. निशिकांत सिंह या क वर्गाच्या शास्त्रज्ञांचा समावेश होता.



भारतीय मानक ब्यूरो कायदा २०१६ नुसार भारतीय मानक ब्यूरोच्या मानक चिन्हांचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान २,००,००० रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. अनेकदा असे आढळून आले आहे की बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी तयार करून विकली जातात.



 म्हणून, सर्वांना विनंती केली जाते की बीआयएस वेबसाइट http://www.bis.gov.in ला भेट देऊन किंवा बीआयएस केअर मोबाईल ऍप्लिकेशन वापरून खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावर आयएसआय मार्कची सत्यता पडताळून पाहा.
नागरिकांना विनंती केली जाते की जर त्यांना कोणत्याही उत्पादनावर आयएसआय मार्कचा गैरवापर झाल्याचे आढळले तर त्यांनी त्याची माहिती प्रमुख, MUBO-II, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, BIS, मनकालय, E९, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी ( पूर्व), मुंबई - ४०० ०९३ येथे कळवावी. अशा तक्रारी [email protected] या ई -मेलवरही करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल, असे बीआयएसतर्फे आवाहन करण्यात आले आहे. 




@@AUTHORINFO_V1@@