दिग्गज क्रिकेटपटूंची कारकीर्द घडविणारे वासू परांजपे यांचे निधन

01 Sep 2021 10:20:33

vasu paranjpe_1 &nbs
 
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पिढ्या घडविणारे आणि अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची कारकीर्द घडविणारे भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य वासू परांजपे यांचे ३० ऑगस्ट रोजी निधन झाले. लिटल मास्टर सुनील गावस्कर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. सुनील गावस्कर यांना 'सनी' हे नावदेखील त्यांची दिले होते. मुंबईसह भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचे प्रशिक्षक म्हणून मोलाचे योगदान आहे. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे ते वडील आहेत.
 
 
 
मुंबई आणि बडोद्याकडून २९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य हे प्रशिक्षक म्हणून काम केले. क्रिकेटपटूंमधील क्षमता आणि खेळ ओळखण्याची नजर त्यांच्याकडे होती. दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड १४ वर्षांचा असताना 'तू भारताकडून खेळशील, पण त्यासाठी यष्टिरक्षणपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष दे.' असा सल्ला दिला होता. त्यानंतर राहुल द्रविडचे नाव हे भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात घेतले जाते. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0