तुम्ही लवकर बरे व्हा, फेरीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करु - राज ठाकरे...

01 Sep 2021 17:17:22
RAJ_1  H x W: 0
 

ठाणे : कासारवडवली येथे फेरीवाल्याने महिला सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हाला केला. या हल्ल्यात पिंपळे जखमी झाल्याने, राज ठाकरे यांनी त्यांच्या तबेत्येची विचारपूस केली. यावेळी राज ठाकरे यांनी पिंपळे यांना आश्वासन दिले की "तुम्ही लवकर बरे व्हा" फेरीवाल्यांच्या गुंडप्रवृत्तीला आपण आळा घालू. राज ठाकरे यांच्यासोबत यांचे चिरंजीव अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.
 
 
कासारवडवली येथे माथेफिरु फेरीवाल्याच्या हल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे व त्यांच्या अंगरक्षकाचे एक बोट तुटले.त्यामुळे पिंपळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मनसेच्या स्थापनेपासूनच अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रखर भूमिका घेतली.अनधिकृत फेरीवाल्यांची ही कीड वेळीच ठेचली नाही तर,भविष्यात देखील असे हल्ले होतील.असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी दिला.
 
 
Powered By Sangraha 9.0