हिंदू बहुसंख्य असतील तरच संविधान आणि महिला सुरक्षित राहतील

01 Sep 2021 18:20:09
ravi_1  H x W:

‘त्यांची’ संख्या वाढल्यास भारताचा अफगाणिस्तान होईल
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारतात हिंदू बहुसंख्य असतील तरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आणि महिला सुरक्षित राहतील. देशात हिंदू अल्पसंख्य झाले तर गांधारमध्ये (अफगाणिस्तान) जे घडले तेच भारतातही घडेल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र प्रभारी आणि कर्नाटकचे आमदार सी. टी. रवी यांनी बुधवारी कलबुर्गी येथे केले.
 
 
भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंतच भापरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सुरक्षित राहिल. हिंदूंची बहुसंख्या असेपर्यंतच देशात प्रत्येक घटकाला समान संधी प्राप्त होईल. ज्या दिवशी देशात हिंदू अल्पसंख्य होतील, त्याच दिवशी सध्या गांधारमध्ये (अफगाणिस्तान) जे घडत आहे; तशी परिस्थिती भारतातही निर्माण होईल. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे ज्यांना रक्षण करायचे आहे, त्यांनी ही बाब नेहमी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे, असे सी. टी. रवी म्हणाले.
 
 
सेक्युलारिझम आणि धार्मिक सहिष्णुता हे गुण हिंदूंचे वैशिष्ट्य असल्याचे रवी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जोपर्यंत बहुसंख्यांक समाज सहिष्णु आहे तोपर्यंतत सेक्युलारिझम टिकणे शक्य आहे आणि महिलांचे संरक्षण होणे शक्य आहे. ज्या दिवशी सहिष्णु असणारा समाज अल्पसंख्यांक होईल आणि बिगरहिंदूं बहुसंख्य होतील, त्या दिवशी देशात डॉ. आंबेडकरांची नव्हे तर ‘शरियत’ची भाषा बोलली जाईल. त्यामुळे लांगुलचालनाच्या राजकारणामुळे देशातच पाकिस्तानची निर्मिती होईल. लांगुलचालन केल्याने तात्पुरती सत्ता मिळाली तरीही देश धोक्यात येईल. त्यामुळेच भाजप कधीही लांगुलचालनाचे राजकरण करत नाही, ‘सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हाच भाजपचा मंत्र असल्याचेही रवी यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0