प्रिय नीरज,तूच खरा 'गोल्डमॅन'

08 Aug 2021 20:22:53

letter_1  H x W
 
 
प्रिय नीरज,

 
    . पत्रास कारण की, शनिवारी झालेल्या ‘भालाफेकी’च्या सामन्यामध्ये तू ‘सुवर्ण’पदकावर मोहर उमटवलीस. त्याबद्दल तुझे सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन!
 
क्रिकेटप्रेमींचा देश अशी आपली ओळख सांगणार्‍या इथल्या भारतीयांना तू पटकविलेल्या सुवर्णपदकामुळे झालेला आनंद बघून काल आनंद वाटला. प्रत्येक ठिकाणी या राष्ट्राचा झेंडा जेव्हा-जेव्हा सन्मानाने फडकतो, तेव्हा-तेव्हा इथल्या भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो.
नीरज, तू मिळविलेल्या यशाने आज तू भारतीयांचा चेहरा म्हणून ओळखशील देखील. येत्या काळामध्ये तुझ्याकडून भारताचा चेहरा म्हणून इथला तरुण नक्की प्रेरणा घेणार आहे. तुझ्या यशाला सलाम करताना तुझ्या संयमालादेखील सलाम आहे. नीरज, आज देशाचा सन्मान वाढविण्याचे काम तुम्ही पदके जिंकून केले आहे. पण, हा सन्मान इतिहासातील भारताचे नाव जगामध्ये सन्मानाने घेतले जाईल, असाच आहे.
 
प्रिय नीरज, २०१६ मध्येच तू सांगितलेलेस, “२०२० च्या ‘ऑलिम्पिक’मध्ये मी पदक नक्की आणेण म्हणून” आणि तू समाजमाध्यमातून व्यक्त होताना लिहिलेसदेखील-
 
‘जब सफलता की ख्वाहिश आपको सोने ना दे
जब मेहनत के अलावा और कुछ अच्छा ना लगे
जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो
समझ लेना सफलता का नया इतिहास रचने वाला हैं।’

आणि तो तू इतिहास रचलादेखील आहेस.तुला आणि ज्यांनी ज्यांनी पदके जिंकली, अशा मीराबाई, सिंधू, रवि कुमार, लवलीना, भारतीय पुरुष संघ हॉकी अशा तुम्हा सर्वांना सलाम!!!
 
नीरज, तुझ्या या सुवर्णपदकाच्या निमित्ताने एक बाब प्रकर्षाने उल्लेख करण्यासारखी आहे. ती अशी की, तरुणांच्या देशामध्ये सध्या ‘गोल्ड मॅन’ म्हणून फिरणारी माणसं, तू जेव्हा तुझे सुवर्णपदक जिंकले, तेव्हा ती लोकं मला खुजी वाटू लागली.चौकाचौकांमध्ये निर्माण झालेल्या ‘गोल्ड मॅन’च्या या काळामध्ये तुझ्यासारखी देशाला गौरवांकित करणारी प्रेरणादायी माणसं, यातील फरक इथल्या तरुणाला समजेल, तो दिवस या देशासाठी अभिमानास्पद असेल.

‘विश्वगुरू’ म्हणून उभरणार्‍या भारतासाठी तुम्ही मिळवलेले यशसुद्धा एक नवी ओळख निर्माण करेल. यामध्ये शंका नाही.स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवसांपूर्वीच तुझ्या सुवर्णपदकाच्या निमित्ताने तिरंग्याला सलाम करताना इथल्या प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच निर्माण करणारी तुमची कामगिरी असून, तुम्ही देशाचा गौरव वाढविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!!


 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0