ऑस्ट्रेलियात जनगणनेत ’मराठी’ भाषेला स्थान

    दिनांक  05-Aug-2021 14:40:14
|

Marathi _1  H x

मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये जनगणना सुरू असून यामध्ये मराठी भाषिकांची गणती होणार आहे. यामध्ये घरामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणून आवर्जून लिहिण्याचे आवाहन व्हिक्टोरियातील महाराष्ट्र मंडळाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया यांनी ऑस्ट्रेलियातील मराठी बांधवांना आवाहन केले असून यासाठी त्यांच्याकडून वैयक्तिक संपर्क, समाज माधमाच्या माध्यमातून मराठी माणसांशी संपर्क साधला जात आहे.
 
 
 
ऑस्ट्रेलियामध्ये भारतासह इतर देशातील अनेक नागरिक रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. भारतातील मराठीसह, गुजराती, तेलुगू, तामिळ, हिंदी भाषिक ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत. यातील बहुतांशीजण घरात बोलणारी भाषा म्हणून आपल्या मातृभाषेची माहिती देतात.

मराठी भाषिकांकडून या रकान्याकडे दुर्लक्ष केले जात होते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. व्हिक्टोरियातील महाराष्ट्र मंडळाचे अनेक सदस्य आहेत. व्हिक्टोरियातील महाराष्ट्र मंडळाच्यावतीने मराठीची नोंद करण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील मराठी भाषिकांकडून याला सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. या मोहिमेत महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरियाने मेलबर्नमधील इतर महराष्ट्र मंडळ व संस्थेशी चर्चा करून सगळ्यांना एकत्र आणले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.