टोकियो पॅरालिम्पिक २०२० : पुन्हा एकदा पदकांचा दुहेरी धमाका

31 Aug 2021 17:51:49

para_1  H x W:
टोकियो : भारतीयांसाठी पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताच्या नावावर आणखी २ पदके वाढली आहेत. भारताला उंच उडी प्रकारात एक रौप्य आणि एक कांस्य पदकांची कमाई केली आहे. थंगावेलू मरियप्पनने १.८८ मीटर उडी मारत रौप्य पदकावर नाव कोरले,तर शरद कुमारने १.८३ मी उंच उडी मारत कांस्यपदक पटकावले आहे. याचसोबत पहिल्यांदाच भारताने पॅरालिम्पिकमध्ये दुहेरी आकडा गाठला आहे. तसेच, आजच्या दिवशीच नेमबाज सिंहराज अधाना यांनी १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे.
  
 
मरियप्पनने यापूर्वी रियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यामुळे याहीवर्षी त्याच्याकडून पदकाची अपेक्षा भारतीयांकडून केली जात होती. अंतिम फेरीत काहीकाळ तो सुवर्ण पदकाचा मानकरीही होता मात्र अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. शरद कुमारनेदेखील अनपेक्षित कामगिरी करत कांस्य पदक पटकावून भारताच्या नावावर आणखी एक पदक पटकावले. भारतीयांकडून या दोघांचेही कौतुक करण्यात येत आहे. आता भारताच्या नावावर १० पदके असून त्यामध्ये २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदक आहेत. ही भारताची सर्वोच्च कामगिरी आहे
 
 
Powered By Sangraha 9.0