खा. पूनम महाजनांच्या माध्यमातून घडतायेत भावी लष्कर आणि पोलीस अधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2021
Total Views |

poonam mahajan_1 &nb


पूनम महाजन करिअर अकॅडेमिच्या माध्यमातून चालविण्यात येतात मोफत प्रशिक्षण वर्ग


मुंबई:
खा. पूनम महाजन करिअर अकॅडमीच्या माध्यमातून लष्करात तसेच पोलिसांत भरती होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मागील ८ महिन्यांपासून व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग चालविले जात आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल ८० तरुण तरुणींनी यामध्ये सहभाग नोंदवला असून आज भावी अधिकारी होण्यासाठी हे तरुण तरुणी सज्ज आहेत.


पूनम महाजन महिला बचतगट महासंघाच्या माध्यमातून या ट्रेनींग कॅम्पची संकल्पना पुढे आली. देशात किंवा मुंबईत महिला बचत गटाच्या माध्यमातून असे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग चालविणारा हा पहिलाच महिला बचत गट आहे. २६ जानेवारीला हा पूनम महाजन करिअर अकॅडेमिचा पहिला प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला. ऑनलाईन, ऑफलाईन आणि ग्राउंडवर हे ट्रेनींग दिले जाते. सुरुवातील केवळ ५ ते ६ तरुण-तरुणी यात सहभागी झाले. मात्र बॅनर आणि काही पोस्टरच्या माध्यमातून या सरावासाठी तरुण तरुणींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर उत्तम प्रतिसाद या शिबिराला मिळाला. कुर्ला आणि चांदवली या दोन ठिकाणी हे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. मुलांपेक्षा या प्रशिक्षण शिबिराला मुलींचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एकूण संख्येपैकी ७० टक्के मुली यात प्रशिक्षण घेत आहेत.


८ महिन्यांच्या मेहनतीने, माझ्या मतदारसंघातील हे ८० इच्छुक तरुण ज्यांना लष्कर आणि पोलिसात भरती व्हायचे आहे आणि आमच्या देशाची सेवा करायची आहे, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. आम्ही यावर्षी जानेवारीमध्ये चांदिवलीमध्ये हे शिबीर सुरू केले आहे. त्याच प्रकारचे प्रशिक्षण शिबिर लवकरच सुरु करणार आहोत!


- पूनम महाजन, भाजप खासदार



निशुल्क पद्धतीने हे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. दररोज पहाटे ५ वाजता ट्रेनींग सुरु होते. यात फिजिकल ट्रेनींग घेतले जाते. त्यानंतर गणित, इतिहास, राज्यशास्त्र या विषयांचा सर्व करून घेतला जातो. कोरोनाकाळात या सर्व मुलांचे ऑनलाईन लेक्चर होत होते.चांदिवली ते विक्रोळी रोज ही मुलं धावण्यासाठी जातात.मागील दोन वर्षांपासून पोलीस भरतीच्या कोणत्याही परीक्षा झाल्या नाही त्यामुळे ही मुलं परीक्षांच्या प्रतीक्षेत आहेत. आजही हे सराव वर्ग नियमितपणे सुरु आहे. चांदिवली, कुर्ला त्याभागातील तरुण यामध्ये सहभागी आहेत. ८० तरुण तरुणी यामध्ये सहभागी आहेत.


- प्रशांत मौर्य,co -ordinator


प्रशिक्षण संपूर्णतः मोफत आहे. केवळ विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करावे लागतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करणे शक्य नाही अशा मुलांना अकॅडेमिच पुस्तकही देते. जेव्हा मीनल ताईंनी ही संकल्पना मंडळी तेव्हा पूनम दीदींनी आम्हाला प्रोत्साहन दिलं.या संकल्पनेचं स्वागत करत त्यांनी आम्हाला आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याचे आश्वासनही दिलं. आमच्याकडे त्या त्या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी पोलीस अधिकारी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आहेत. तसेच त्या तज्ज्ञ व्यक्तीही कोणतंही मानधन न घेता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बाहेर फी भरून हे प्रशिक्षण घेणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच हा उपक्रम सुरु झाला. आज ८० तरुण तरुणींना आम्ही प्रशिक्षण देत आहोत.


-सुजाता देसाई,co -ordinator
@@AUTHORINFO_V1@@