मंदिरे उघडण्यासाठी भाजपचा ठाण्यात शंखनाद

30 Aug 2021 12:04:15

thane_1  H x W:
ठाणे : देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या अधर्मी आणि जुलमी ठाकरे सरकार विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्यावतीने राज्यभर शंखनाद आंदोलन छेडले आहे.
 
 
ठाण्यातही मंदिरे उघडावी या मागणीकरिता जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे भाजपातर्फे शंखनाद आंदोलन व महाआरती करण्यात आली. यावेळी भाजप प्रदेश सचिव संदीप लेले, नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर, अध्यात्मिक आघाडीचे विकास घांग्रेकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्यासह महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, सोलापूरसह शिर्डीमध्येदेखील भाजप नेत्यांनी आंदोलने केली.
 
 
Powered By Sangraha 9.0