अनिल परबच नव्हे तर "हे" १० नेते तपास यंत्रणांच्या रडारवर!

30 Aug 2021 14:14:51

Kirit Sommiaiya _1 &
 


मुंबई : ठाकरे सरकारमधील परिवाहनमंत्री अनिल परब यांना मंगळवारी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश नोटीशीमार्फत दिले आहेत. ईडीने या नोटीशीत कुठल्याही प्रकारच्या प्रकरणांचा उल्लेख केलेला नाही. किरीट सोमय्या यांनी ही कारवाई कायदेशीर असल्याचे म्हणत आणखी १० नेत्यांवर ही कारवाई होणार असल्याची यादीच ट्विट केली आहे. या यादीला ठाकरे सरकारचे 'महान इलेव्हेन', असे या यादीला नाव दिले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या बांधकाम व्यावसाय आणि हॉटेल व्यावसायांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कथित शंभर कोटी वसुली प्रकरणात नाव आल्याने त्यांच्यामागेही तपास यंत्रणांचा ससमीरा कायम आहे. परिवाहनमंत्री अनिल परब यांचेही नाव या यादीत आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

१८ कोटींची रोख रक्कम काढणे, कार्यालयात ७ कोटी रोख ठेवणे तसेच NCDC आणि एसबीआयला फसविणे या प्रकरणात आरोप करत सोमय्या यांनी केंद्रातील राज्यमंत्र्यांची भेट घेतली. सोमय्या यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, राजेंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, शंभर कोटींची बेहिशोबी मालमत्ता कारवाई झालेले छगन भुजबळ यांचेही नाव या यादीत टाकले आहे. पालिका अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव आणि मिलींद नार्वेकर यांचेही नाव या यादीत टाकण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0