टोकियो : टोकियो इथे सुरु असलेया ऑलिम्पिक २०२१मध्ये स्पर्धेसोबतच अनेकवेळा माणुसकीचे दर्शनही घडते. असाच एक प्रसंग ऑलिम्पिकमध्ये घडला. एका सुवर्ण विजेत्या स्पर्धकाने आपले पदक हे प्रतीस्पर्ध्यासोबत शेअर केले आहे. उंच उडीत कतारच्या ३० वर्षीय मुताज इस्सा बर्सिम आणि इटलीच्या २९ वर्षीय जियान मारको ताम्बरी संयुक्त सुवर्ण पदक विजेते ठरले.
त्याचे झाले असे की. उंच उडीच्या अंतिम फेरीत दोन्ही खेळाडू २.३७ मीटरसह बरोबरीत होते. नियमानुसार अशा स्थितीत जम्प ऑफ केले जाते. यामध्ये प्रत्येक अॅथलिट अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या उंचीवर उडी मारतो. याच आधारावर विजेता ठरतो. नियमाप्रमाणे याची अंमलबजावणी केली जाणार होती. क्रीडा अधिकाऱ्यांनी जेव्हा जम्प ऑफबद्दल तेव्हा कतारचा अॅथलिट बर्शिमला सांगितले. तेव्हा त्याने, आम्ही हे सुवर्ण पदक शेअर करु शकतो का? असे अधिकाऱ्यांना विचारले. अधिकाऱ्यांनी याला होकार दिला आणि कतार आणि इराणच्या खेळाडूला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.
बेलारुसचा माकसिम नेडासेकाऊ कांस्य पदकाचा विजेता ठरला. तर रौप्य पदक कोणत्याही खेळाडूला देण्यात आले नाही. सुवर्ण पदक शेअर केल्यानंतर बर्शिम म्हणाला, "जियान आणि मी चांगले मित्र आहोत. फक्त ट्रॅकवरच नाही तर बाहेरदेखील चांगले मित्र आहोत. आम्ही सोबत काम करतो. ही बाब एक स्वप्नासारखी आहे. ही खरी खेळभावना आहे."