'करारा जवाब मिलेगा !' राणे सुपुत्रांचा इशारा

25 Aug 2021 13:23:48


mah_1  H x W: 0


मुंबई
: मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अटक सत्रानंतर आता राणे सुपुत्रांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून ४ अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता नारायण राणेंवर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर नितेश राणे यांनी विरोधकांना फिल्मी अंदाजात आव्हान दिले आहे. नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी यांचा ‘राजनिती’ या चित्रपटामधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
 
 
 
 
 
या व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करत म्हणतात की, "आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है, की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी," तर पुढे "करारा जवाब मिलेगा" असेही त्यांना म्हंटळे आहे. व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी विरोधकांना थेट धमकी दिली आहे. तसेच निलेश राणे यांनीदेखील शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
 
 
 
 
 
निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की, "काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचे मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचे काही उखडू शकले नाही. औकात कळली??" असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0