खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या! औकात दाखवू

24 Aug 2021 12:33:10

Uddhav Thackeray _1 




मुंबई : नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राणेंना अटक करण्यासाठी नाशिकमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणेंनीही या सर्व प्रकारावरून शिवसेनेवर आसूड ओढळे आहेत.

"कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही.", अशी प्रतिक्रीया या प्रकाराबद्दल व्यक्त केली आहे. "खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.", असा इशाराही त्यांनी व्यक्त केली आहे.




Powered By Sangraha 9.0