भाजपा नगरसेवकावर मनपा मुख्याल्यासमोर हल्ला

24 Aug 2021 19:23:26

BJP ulhasnagar_1 &nb
 
 

 भाजपा नगरसेवकावर मनपा मुख्याल्यासमोर हल्ला





उल्हासनगर : उल्हानगर महानगरपालिका मुख्यालयासमोर काल दुपारच्या सुमारास "भाजप"च्या नगरसेवकाला सात ते आठ जणांनी मारहाण करून त्यांचेवर काळी शाई फेकण्याचे निंदनीय कृत्य करण्यात आले.मिळालेल्या माहिती नुसार भाजप चे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांचे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कार्यालय आहे. काल दुपारच्या सुमारास ते आपल्या कार्यालयाच्या बाहेर पडले असता सात ते आठ जणांनी त्यांचेवर हल्ला केला
 
 
त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली व त्यांचेवर काळी शाई फेकली. रामचंदानी यांना मारहाणीतून वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा रोहित मध्ये आला असता त्याला सुद्धा जबर मारहाण करण्यात आली. सदर घटनेची खबर समजताच भाजप आमदार कुमार आयलानी व आमदार गणपत गायकवाड घटनास्थळी पोहोचले. प्रदीप रामचंदानी व त्यांचा मुलगा रोहित याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत मी सतत सोशल माध्यमांवर लिहत असतो त्याचा राग मनात धरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असल्याचे प्रदीप रामचंदानी यांनी स्पष्ट केले. हल्ला करण्या-यां विरोधात तक्रार दाखल करावी व त्यांना योग्य शासन करण्यासाठी आमदार कुमार आयलानी व आमदार गणपत गायकवाड यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त डी डी टेळे यांनी भेट घेतली.




Powered By Sangraha 9.0