आरोग्यापेक्षा सण महत्वाचे नाहीत : मुख्यमंत्री

23 Aug 2021 14:45:06

Uddhav _1  H x





मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाराष्ट्रातील प्रमुख गोविंदा पथकांसह बैठक घेतली. यावेळी जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊयात, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी सण-वार, उत्सव काहीकाळ बाजूला ठेवूयात, मानवता दाखवू आणि कोरोना हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत, परंतू, आरोग्याचा प्रश्न असल्याने प्राधान्याने हा प्रश्न समोर ठेवून निर्णय घ्यावा लागेल.

ठाकरे म्हणाले, "दहीहंडी हा बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावे. लस घेतल्यावरही काही देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केली आहे. अर्थचक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे."

"आपण दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर आलो आहे. आत्ता मिळालेल्या अवकाशाचा वापर अर्थचक्र सुरळीत सुरू करण्यासाठी करूयात जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपराही काहीवेळ समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल.", असेही ते म्हणाले.


या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. "तिसरी लाट जगातील अनेक देशांत आली आहे. सर्व धर्मियांच्या सणांना महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या सुरक्षेची काळजी घेत निर्णय घेतले. त्याला जनतेनेही सहकार्य केले. जे आता पर्यंत आपण सगळं सांभाळले आहे त्यामुळे आता भविष्यातही कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे."

यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Video conferencing द्वारे संवाद साधला. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे. गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. तसेच कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी, दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील, असे म्हणत त्यांनी परवानगी मागितली आहे.
मुंबई पोलीसांचे म्हणणे काय?


काही महिने आपण निर्बंधात असल्यामुळे आपण दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो. दहीहंडी नतर लगेच गणेशोत्सव येईल. दहीहंडी उत्सवाला थोडी शिथिलता दिली तर पुढे गणेशोत्सव मंडळेही तशाच प्रकारची सवलत मागणार आहेत, त्यामुळे आता सावध भूमिका घ्यायला हवी, असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले.
Powered By Sangraha 9.0