VIDEO : ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हिंदीतून मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार

    दिनांक  23-Aug-2021 15:51:37
|

 Hindi _1  H x
लखनऊ :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ब्रिटिश उच्चायुक्त एलेक्स इलीस यांनी भेट घेतली. लखनऊमध्ये त्यांचा पहिलाच दौरा होता. त्यावेळी मुख्यमंत्री योगींशी त्यांच्याशी गुंतवणूक, व्यापार आणि अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य आदी विषयांनाही त्यांनी स्पर्श केला.
विशेष म्हणजे एलेक्स इलीस यांनी या संदर्भातील एक हिंदी व्हीडिओ ट्विट केला आहे. त्यात ते म्हणतात, "मै मुस्कूरा रहा हू क्यूंकी मै लखनऊ मै हू..." मी योगी आदित्यनाथ यांना भेटलो. आम्ही गुंतवणूक, शिक्षण आरोग्य या विषयांवर चर्चा केली. आम्ही याच दृष्टीने प्रमुख पावले उचलणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला तसे मार्गदर्शन केले होते. रोजगारनिर्मितीसंदर्भातही चर्चा झाली, असेही ते म्हणाले. इथली गंगा-जमूना नदी, खाद्यसंस्कृतीही मला भावली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.