तालिबानचा अफगाणिस्तान क्रिकेटला पाठींबा, म्हणाले...

अफगानिस्तान क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयोन्मुख संघ म्हणून ओळख

    23-Aug-2021
Total Views |

Afghanistan_1  
 
नवी दिल्ली : एकीकडे तालिबानने अफगानिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या अफगानिस्तान क्रिकेट संघाचे काय होणार? असा मोठा प्रश्न पडला होता. यावर आता तालिबानने स्पष्टीकरण दिले असून संघामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नसल्याचे सांगितले. अफगानिस्तान संघाने सर्व काम पूर्वनियोजित कालावधीत होणार असून तालिबान देशातील क्रिकेटला पूर्णपणे पाठिंबा देत राहील, असे आश्वासन एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना दिले आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानी नेता अनस हक्कानी याने नुकतेच अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी याच्यासह क्रिकेट बोर्डचे माजी अधिकारी असदुल्लाह, नूर अली जादरान यांची भेट घेतली. यावेळी हक्कानी यांनी १९९६ ते २००१ या त्यांच्या सत्तेतच देशात क्रिकेटची सुरुवात झाली होती. आमचा क्रिकेटला कायम पाठिंबा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
अफगानिस्तान खेळाडूंचे आयपीएलमधील भविष्य काय?
 
 
तालिबान आणि भारत याचा इतिहास काही सर्वांसाठी नवीन नाही. जरी तालिबानने अफगानिस्तानच्या क्रिकेटला आश्वासन दिले असले, तरीही त्यांचे आयपीएलमधील भविष्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आयपीएलमध्ये राशीद खान, मोहम्मद नबी सारख्या अफगाणी खेळाडूंची जास्त मागणी आहे. हे दोघेही आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे बीसीसीआयणे आधीच स्पष्ट केले आहे. तरीही तालिबानने दिलेल्या आश्वासनावर कितीपत विश्वास थव्याचा हादेखील प्रश्न सध्या क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
 
अफगानिस्तान क्रिकेट बोर्डात फेरबदल
 
तालिबानने अफगानिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख अजीजुल्लाह फाजली यांची नियुक्ती करण्यात आली. अफगानिस्तान क्रिकेट बोरादाने ट्विट केले आहे की, "एसीबीचे माजी अध्यक्ष अजीजुल्लाह फाजली यांची पुन्हा मंडळाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आगामी स्पर्धांसाठी एसीबीचे नेतृत्व करतील. तसेच मंडळाच्या कार्यवाहीवरही देखरेख ठेवतील."
 
गेली दोन दशके अजीजुल्लाह फाजली हे अफगानिस्तान क्रिकेटशी संबधित आहेत. यापूर्वी सप्टेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत एसीबीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. देशात खेळाबद्दल विकास करणाऱ्या प्रस्थापित खेळाडींच्या पहिल्या गटात फाजलीचा समावेश होता. तसेच, एसीबीचे उपाध्यक्ष आणि सल्लागार म्हणूनही काम पाहिले होते.