भावानं सांगितलं होतं राखी बांध, चितेवर बांधावी लागली राखी

23 Aug 2021 13:08:10

Maha MTB _1  H


 
नागौर : भावाबहिणीचा सण रक्षाबंधनाचा सण देशभरात साजरा झाला परंतू, मनाला चटका लावून जाणारी घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील नागौरच्या भागात हरसौर गाव रक्षाबंधनाच्या दिवशी हळहळलं. गावातील चिरंजीलाल BSFमध्ये हेड काँस्टेबल होते. स्वतंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या परेडमध्येही ते सहभागी झाले होते. १७ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

चिरंजी यांनी आपल्या बहिणीला यंदा सांगितलं होतं की, घरी येऊन राखी बांध. गेल्या चार वर्षांपासून त्यांना रक्षाबंधन साजरे करता आले नव्हते. लक्ष्मी यांनी शेवटी चिरंजीलालच्या चितेवर पर राखी बांधली. परंपरेनुसार, अंतिम संस्कारानंतर फूल निवडल्यानंतर चितेवर तिसऱ्या दिवशी त्रिपादुकावर पाण्याने भरलेला मटकं १२ दिवसांसाठी ठेवलं जाते.


लक्ष्मी रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी आपल्या भाची म्हणजेच चिरंजीलालच्या मुलीसह स्मशानभूमीत पोहोचली आणि तिथे ठेवण्यात आलेल्या अस्थींना राखी बांधली. बहिणीचं म्हणणं आहे की, अजूनही माझं मन मानायला तयार नाही की, माझा भाऊ या जगात नाही. माझा भाऊ देशासाठी हुतात्मा झाला त्याचा मला अभिमान आहे. आज मला हुतात्म्याची बहिण म्हणून स्वीकारतात.

१३ ऑगस्ट रोजीच झाली होती भेट


लक्ष्मीने सांगितले की, चिरंजीलाल सहा वर्षे तिच्यापेक्षा वयाने मोठे होते. शेवटची राखी २०१७मध्ये बांधली होती. गेल्या वर्षी राखी पाठवू शकली नाही. १३ ऑगस्ट रोजी जयपूरमध्ये मला भेटण्यासाठी आले होते. "गेल्यावेळी राखी बांधता आली नाही यावेळी तरी घरी नक्की ये," असे त्यांनी सांगितले होते.


"तु बनवलेली भेंडीची भाजी मला आवडते. माझ्या दोन मुलींची लग्नही तुझीच जबाबदारी आहे, चांगलं घर त्यांच्यासाठी निवड. मला समजत नव्हतं तो अचानक असं का म्हणतोय." त्याच्या जाण्याची बातमी आली तेव्हा या गोष्टी नजरेसमोरून गेल्या. १९९७ मध्ये माझंही कन्यादान त्यांनीच केलं होतं, अशा भावना बहिणीनं आपल्या हुतात्मा भावासाठी व्यक्त केल्या.



Powered By Sangraha 9.0