आयकर परताव्याच्या अडचणी संपेनात इन्फोसिसला समन्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2021
Total Views |

Salil Parekh _1 &nbs
 
नवी दिल्ली : करपरतावा अधिक सोपा जावा यासाठी आयकर विभागाची नवी वेबसाईट सुरू झाली होती. परंतू, आयकरदात्यांना परतावा भरण्यास येणाऱ्या अडचणींमुळे अनेक तक्रारी आल्या होत्या. आयकर विभागाच्या नव्या संकेतस्थळाला सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी इन्फोसिस या कंपनीकडे देण्यात आली होती. मात्र, अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने कंपनीचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाने समन्स बजावले आहे.
 
 
अडीच महिन्यांपासून आयकरची नवी ई-फाईलिंग पोर्टल सेवा सुरू आहे. मात्र, तांत्रिक दोष दूर न झाल्याने अनेक आयकर दात्यांना त्यात अडचणी येत आहेत. सोमवार दि. २३ ऑगस्ट रोजी सलील पारेख यांनी याबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे.
 
 

आयकर परताव्याच्या अडचणी संपेना
 
आयकर विभागाच्या नव्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये करभरणा करताना समस्या येत आहेत. आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. करभरणा करण्याचा अंतिम दिनांकही जवळ येत आहे, त्यामुळे अनेकांची चिंता वाढू लागली आहे. अनेकांनी त्यात वाढ करून मिळावी, अशीही मागणी केली आहे.
 
 
७ रोजी सुरू करण्यात आले नवे संकेतस्थळ
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, तसेच सोपी व्हावी या हेतूने ७ जून रोजी ही वेबसाईट सुरू करण्यात आली. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे ही ई-फायलिंग संकेतस्थळाबद्दलचा अनुभव त्रासदायक होता. पहिल्या दिवसापासून या संकेतस्थळाबाबत तक्रारी सुरू झाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणाऱ्या इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारला होता.
@@AUTHORINFO_V1@@