मोदी सरकार आणणार 'ई-व्हाऊचर बेस्ड' 'डिजिटल पेमेंट सॉल्यूशन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2021
Total Views |

NEWS 1 _1  H x



नवी दिल्ली :  डिजिटल इंडिया योजनेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी एका व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे डिजिटल पेमेंट सॉल्यूशन ई-रुपी (e-RUPI) या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ई-रुपी ही एक प्रीपेड ई-व्हाउचर सेवा आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे ही विकसित केले जाणार आहे. कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. शेवटच्यापर्यंत व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचवावा यासाठी या योजनेचा वापर केला जाणार असल्याचे मत केंद्र सरकारनं व्यक्त केले आहे.

 
कॅशलेस आणि संपर्क विरहीत रोख सेवा
 
या सेवेत देवाण घेवाण करणाऱ्या व्यक्तीशी सहज कनेक्ट होता येते
 
सरकारी योजनांचा लाभ आता थेट लाभार्थ्यांना मिळणार, भ्रष्टाचाराला आळा बसणार
 
एक QR कोड किंवा SMS स्ट्रिंग-बेस्ड वाऊचर असणार आहे. हे थेट लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवले जाणार आहे.
 
वन टाईम पेमेंट सर्विस असल्याने ग्राहक विना कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप, इंटरनेट बँकींग विना वाऊचर रिडीम करू शकणार आहेत.
 
e-RUPI से सरकारी योजनांशी निगडीत विभागांच्या संस्थांना जोडणे शक्य होणार. 
 
व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हीस प्रोव्हायडरला पैसे दिले जातील.
 
प्रीपेड असल्याने कुठल्याही मध्यस्थीविना सेवा देता येणे शक्य होईल.
 
डिजिटल व्हाऊचरचा वापर खासगी क्षेत्रात तसेच कर्मचारी कल्याणाच्या दृष्टीनेही केला जाऊ शकतो.
@@AUTHORINFO_V1@@