IND v ENG : हा खेळाडू भारतीय संघाबाहेर, कोणाला मिळणार संधी?

02 Aug 2021 20:37:28

India_1  H x W:
 
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. आधी कोरोना आणि आता दुखापतीचे ग्रहण विराट कोहलीच्या भारतीय संघाला लागले आहे. आता भारतीय सलामीवीर मयंक अग्रवाल याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिल्या कसोटीमधून बाहेर झाला. त्यामुळे आता रोहित शर्मासोबत सलामी कोण करणार? असा प्रश्न टीम इंडियासमोर उभा राहिला आहे. दुखापतीमुळे शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे तीन खेळाडू आधीच बाहेर झाले होते. त्यात आता मयंकची भर पडली आहे.
 
 
 
 
 
आता मयंक अग्रवालही बाहेर झाल्यामुळे केएल राहुल हा रोहित शर्मासोबत सलामीला खेळतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केएल राहुलने सराव सामन्यामध्ये शतक केले होते. त्यामुळे तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही या दोघांना १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे, यानंतरच ते संघामध्ये प्रवेश करू शकणार आहेत. हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या कसोटीपासून उपलब्ध होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0