खाद्यतेल क्षेत्रातही ‘आत्मनिर्भर’ ११ हजार कोटी रुपयांची तरतूद; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

19 Aug 2021 13:50:04
                                     oil_1  H x W: 0
 
 
खाद्यतेल क्षेत्रातही ‘आत्मनिर्भर’ ११ हजार कोटी रुपयांची तरतूद; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
 
नवी दिल्ली : खाद्यतेल क्षेत्रामध्ये ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी केंद्र सरकारने ‘नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑईल-ऑईल पाम’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत प्रामुख्याने ईशान्य भारतासह अंदमान-निकोबारमध्ये पाम शेतीस प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी ११ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.
 
 
ईशान्य प्रादेशिक कृषी विपणन महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यास मंजुरी‘सीसीईए’ पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ७७.४५ कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. पुनरुज्जीवन पॅकेजच्या अंमलबजावणीसह, ‘एनईआर’च्या शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांच्या मोबदल्याची किंमत सुनिश्चित केली जाईल. पुनरुज्जीवन पॅकेजला विविध नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यास मदत करेल.
 
 
Powered By Sangraha 9.0