देवबंद’मध्ये ‘एटीएस केंद्रा’ची स्थापना होणार

18 Aug 2021 12:19:11
yogo_1  H x W:
 
 
योगी सरकारचा धडाकेबाज निर्णय
 
 
नवी दिल्ली : इस्लामी शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशातील देवबंद येथे दहशतवादविरोधी पथकाच्या केंद्राची (एटीएस) स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. या केंद्रामध्ये निवडक दीड डझन अनुभवी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद हे इस्लामी शिक्षण देणारे प्रमुख केंद्र आहे. येथील दारुल उलूममध्ये शिक्षण घेण्यासाठी जगभरातून मुस्लीम येत असतात.
 
 
येथूनच देवबंदी अभियानास प्रारंभ झाला असून, तालिबानी विचारसरणीचेही हेच प्रेरणास्थान असल्याचे मानले जाते. देशात गेल्या काही वर्षांत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध देवबंदशी असल्याचे उघडकीस आले होते. त्याचप्रमाणे फेब्रुवारी, मध्ये देवबंदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती, तसेच सहारनपूर येथेही अनेक अतिरेकी पकडण्यात आले होते.
त्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ सरकारने येथे ‘एटीएस’ केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवडक दीड डझन अनुभवी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे देवबंदसह सहारनपूर आणि मेरठपर्यंतच्या परिसरावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या केंद्रासाठी योगी सरकारने दोन ह
जार वर्गमीटर जमीनही दिली आहे.
 
Powered By Sangraha 9.0