अफगाण सैन्याला लढायचे नाही तर मग अमेरिका सैन्याने का मरावे - जो. बायडन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2021
Total Views |
america _1  H x



अमेरिका -
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनामध्ये त्यांनी तालिबानच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटलंय. तसेच अमेरिकेत घडलेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातमध्ये कसा प्रवेश केला, याची आठवण त्यांनी केली. जेणेकरून अल-कायदा अमेरिकेच्या विरोधात अफगाणिस्तानची जमीन वापरू शकणार नाही.
 
 
जो बायडन यांनी आपल्या निवेदनामध्ये सविस्तर म्हटले आहे की,अफगाणिस्तानसाठी अमेरिकेचे ध्येय एकसंध आणि केंद्रीकृत लोकशाहीची स्थापना करण्यासाठी किंवा राष्ट्र उभारणीसाठी कधीही नव्हते. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या मोहिमेचे एकच ध्येय होते, ते म्हणजे अमेरिकेवर होणारे हल्ले थांबवणे. आमचे ध्येय दहशतवादाच्या विरोधात होते. २००९ मध्ये उपराष्ट्रपती असतानाही त्यांनी अफगाणिस्तानामधील अमेरिकेच्या सैन्य वाढवण्याच्या निर्णयावर टीका केली होती. आज दहशतवाद केवळ अफगाणिस्तानपुरता मर्यादित नाही. त्यासाठी त्यांनी सोमालियातील अल-शबाब, अरेबियामधील अल-कायदा, सीरियामधील अल-नुसरा आणि आयएसआयएसने आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये आपली संघटना स्थापन करण्यासाठी तेथे खलीफा स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख बायडन यांनी केला. ते म्हणाले की, या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आपले लक्ष आणि संसाधने वापरली पाहिजेत.
 
 
 
बायडन पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेळी अफगाणिस्तानमधून सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली होती. अफगाणिस्तानमध्ये १५ हजार सैनिक ते २,५०० टूप्स होते. त्यामुळे तेथे अधिक सैन्य पाठवल्याने आम्ही युद्धाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश केला असता. अमेरिकन सैन्य मागे घेण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही, असे बायडन म्हणाले आहेत. जे युद्ध अफगाणिस्तानचे सैन्य लढू इच्छित नाही आणि लढाई न करता शस्त्रास्त्रे टाकत आहे, अमेरिकेचे सैन्य तिथे जाऊन आपले प्राण का गमावतील ? ट्रिलियन डॉलर्स खर्च करून 3 लाखांची अफगाणिस्तानची फौज कशी तयार झाली हे त्यांनी सांगितले.अमेरिकेच्या अध्यक्षांच्या मते, अफगाणिस्तानच्या सैन्याला प्रशिक्षण, उपकरणे आणि शस्त्रे देण्यात आली, पगार देण्यात आला, हवाई दल मजबूत करण्यात आले. ते म्हणाले की तालिबानकडे हवाई दलही नाही. ते म्हणाले की आम्ही अफगाण सैन्याला सर्व काही दिले, पण भविष्यात लढण्याची इच्छाशक्ती देऊ शकलो नाही. ते म्हणाले की जर स्वतः अफगाणिस्तानला लढाई करायची नसेल तर अमेरिकन सैन्य कितीही वर्षे तेथे राहिले तरी काही फरक पडणार नाही.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@